Current Affairs | चालू घडामोडी | 13 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 13 SEPT 2024

1) 13 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 13 सप्टेंबर 1948 = ऑपरेशन पोलो

  • भारत सरकारची हैद्राबाद संस्थांनामध्ये प्रत्यक्ष पोलिस कारवाई

1.2) 13 सप्टेंबर 1929 = जतीन दास यांचा मृत्यू

  • लाहोर कारागृहातील 63 दिवसांच्या उपोषणानंतर मृत्यू

2) खेलो इंडिया अंतर्गत राज्यनिहाय दिलेला निधी सर्वाधिक उत्तर प्रदेश व गुजरात यांना देण्यात आला आहे.

3) ‘सेमीकॉन इंडिया’ ही परिषद ग्रेटर नोएडा या ठिकाणी आयोजित केलेली होती.

  • परिषदेमध्ये भारत हा सेमीकंडक्टर चे जागतिक हब बनू शकतो असा निर्धार व्यक्त करण्यात आला
  • तसेच इलेक्ट्रॉनिक्स उद्योगापुढे 500 अब्ज डॉलरचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

4) 70 वर्षांवरील नागरिकांना मिळणार आयुष्यमान कार्ड

  • आता 70 वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेअंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • या निर्णयामुळे 12.3 कोटी कुटुंबांना फायदा होणार असून, 6.5 कोटी वृद्ध नागरिक या योजनेचा थेट फायदा घेणार आहेत.
  • आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वर्षाला 5 लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे
  • योजना सुरुवात : 23 सप्टेंबर 2018

5) NIRF Overall Education Institution रँकिंग

  1. आयआयटी मद्रास
  2. आयआयएससी बेंगळुरू
  3. आयआयटी मुंबई
  4. आयआयटी दिल्ली
  5. आयआयटी कानपूर

    6) NIRF सर्वोत्कृष्ट विद्यापीठ रँकिंग

    1. आयआयएससी बेंगळुरू
    2. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (JNU), दिल्ली
    3. जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली
    4. मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल
    5. बनारस हिंदू विद्यापीठ, बनारस

    7) सातबारा उताऱ्यावर लागणार आईचे नाव

    • 1 मे नंतर जन्मलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करताना बंधनकारक
    • 1 नोव्हेंबर पासून अंमलबजावणी

    8) कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू

    1. वीरेंद्र सेहवाग = 90 षटकार
    2. रोहित शर्मा = 84 षटकार
    3. महेंद्रसिंग धोनी = 78 षटकार

    9) शिक्षक, शिक्षकेतरांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक

    • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नवनियुक्त शिक्षक, सफाई कामगार, चालक अशा सर्वांना व्हेरिफिकेशन बंधनकारक
    • महिला शिक्षकांना देखील व्हेरिफिकेशन बंधनकारक
    • सहावी पर्यंत शक्यतो महिला शिक्षक व महिला कर्मचारी च नेमण्याच्या सूचना
    • व्हेरिफिकेशन म्हणजे काय ?
      • संबंधित व्यक्तीवर आतापर्यंत कोणता गुन्हा दाखल आहे का, त्याची वर्तणूक चांगली आहे का अशा संदर्भातची माहिती या अंतर्गत तपासली जाणार
      • या बाबतचा पोलिसांचा दाखला बंधनकारक

    Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
    MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
    Telegram Channel || WhatsApp Channel

    TelegramWhatsAppCopy LinkShare

    Leave a Comment