Current Affairs | चालू घडामोडी | 14 JUN 2024
1) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तिसऱ्यांदा अजित डोवल यांचे नियुक्ती.
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची निर्मिती 1998 (अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात)
- पहिली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार – ब्रिजेश मिश्रा
- 2014 पासून अजित डोवल यांची नियुक्ती केली तसेच या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा सुद्धा दर्जा दिला आहे.
- प्राधान्यक्रमानुसार हे देशातील सातव्या क्रमांकाचे पद आहे.
- अजित डोवल यांनी भूषवलेले पदे –
– IB चे संचालक
-ऑपरेशन विंगचे प्रमुख
-विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन चे संस्थापक तसेच संचालक.
-1968 च्या केरळ केडरचे IPS अधिकारी
2) ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स (GGGI) 2024
- भारत = 129 वा क्रमांक/ 146 देशांतून
- आइसलँड
- फिनलंड
- नॉर्वे
- न्यूझीलंड
- स्वीडन
- सुदान
- यावर्षी माध्यमिक शिक्षणाबाबत भारतात सर्वाधिक लैंगिक समानता
- 2023 मध्ये भारत 127 व्या क्रमांकावर होता
- सुरुवात = 2006
- चार निर्देशक
- Economic Participation & Opportunity
- Educational Attainment
- Health & Survival
- Political Empowerment
- 0ते 1 मधेच मोजला जातो. 0 म्हणजे खराब आणि 1 म्हणजे चांगले
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अहवाल काढते
- असमानता कमी होण्याचा हाच दर कायम राहिला तर समानतेसाठी 134 वर्ष लागतील असे अहवालात म्हटले आहे
3) भाजप नेते पेमा खांडू तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
- अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुक निकाल 2024
- एकुण जागा – 60
- BJP = 46
- नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) = 5
- IND = 3
- NCP (अजित पवार गट) = 3
- पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (PPA) = 2
- राखीव जागा
SC साठी राखीव – 00
ST साठी राखीव – 59
4) पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी मिश्रा कायम
- माजी आयएएस अधिकारी पी. के. मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आली, असे कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.
- मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉ. मिश्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. १० जूनपासून त्यांची नियुक्ती लागू होईल.
- त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेशान्वये असेल
5) भारत मत्स्य उत्पादनात पुढे, विकास मात्र संथ गतीने
- गोड्या पाण्यातील मत्स्य व अन्य जलचर प्राण्यांच्या उत्पादनात चीन २०१९ पर्यंत अव्वल होता. मात्र त्यानंतर भारताने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
- २०२२ मध्ये देशात १८ लाख ९० हजार टन गोड्या पाण्यातील मत्स्य आणि जलचरांचे उत्पादन झाले आहे
- एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा १६.७ टक्के आहे.
- भारतानंतर बांगलादेश, चीन, म्यानमारचा क्रमांक लागतो
- मात्र, गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनवाढीसाठी चांगली संधी असूनही योग्य समन्वयाअभावी मत्स्य शेतीचा विकास संथ गतीने सुरू
6) भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने कनिष्ठ गटाच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपद मिळवले.
- दिव्याने अखेरच्या फेरीत बल्गेरियाच्या बेलोस्लाव क्रास्तेवाचा पराभव केला
- कोनेरू हम्पी, द्रोणवल्ली हरिका आणि सौम्या स्वामिनाथन यांच्यानंतर जागतिक कनिष्ठ गटाचे जेतेपद मिळवणारी भारताची चौथी महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.
7) भारताचे नवीन लष्कर प्रमुख : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी
- सध्या ते लष्कराचे उपप्रमुख आहेत.
- परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडलने त्यांना गौरविण्यात आले आहे
- द्विवेदी येत्या 30 जून पासून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे सांभाळणार आहेत.
- विद्यमान लष्कर प्रमुख : जनरल मनोज पांडे
8) चीनने चंद्रावर घडविला इतिहास
- चीनने भारत आणि अमेरिकेला मागे टाकत चंद्रावर नवा इतिहास रचला आहे. चीनचे अंतराळयान चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन पृथ्वीच्या दिशेने निघाले आहे.
- चीनचे अंतराळयान चंद्राच्या अंधारात असलेल्या भागात उतरले असून तेथील पृष्ठभागाचे नमुने घेऊन चीनचे यान पृथ्वीच्या दिशेने निघाले आहे.
- चंद्राच्या अंधाऱ्या भागात उतरलेले चिनी अंतराळयान = चांगई-६
9) ‘आदित्य’ने टिपली सूर्यावर उठलेली भीषण सौर वादळे
- ‘इस्रो’ने दिली माहिती, मे महिन्यात निर्माण झालेली वादळे यानाच्या सेन्सर्सनी केली कॅमेऱ्यात कैद
- काय सांगितले ‘इस्रो’ने?
- कोरोनल मास इजेक्शनशी संबंधित एक्स आणि एम क्लास फ्लेअर्स अर्थात सौर लहरींमुळे भू- चुंबकीय वादळे निर्माण होतात. या वादळांना रेकॉर्ड करण्यात आले आहे.
- ८ ते १५ मे या कालावधीत अनेक वादळे निर्माण झाली. त्यातून ११ मे रोजी एक मोठे सौर वादळ निर्माण झाले होते. या वादळाची छायाचित्रे १७ मे रोजी पाठविण्यात आली होती.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel