Current Affairs | चालू घडामोडी | 16 JULY 2024
1) 16 JULY
- 1661: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.
- 1969: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-11 अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आला.
- 1951: ब्रिटनने नेपाळला स्वतंत्र घोषित केले.
2) कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी : वसंत आबाजी डहाके
- ज्येष्ठ कवी, भाषातज्ज्ञ, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
- न्या. चपळगांवकर यांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षपदाची सूत्रे वसंत आबाजी डहाके यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने घेतला.
- कोण आहेत वसंत आबाजी डहाके..
- ‘चित्रलिपी’ या संग्रहाकरिता 2009 सालच्या साहित्य अकादमी पुरस्कार
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार 2019
- 2012 च्या चंद्रपूर येथे झालेल्या 85 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
3) गोखले संस्थेच्या कुलपतीपदी अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय
- गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपती पदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांची नियुक्ती करण्यात आली.
- डॉ. देबरॉय सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, केंद्र सरकारच्या नीती आयोगाचेही ते सदस्य होते.
- 2015 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.
4) Euro Cup फुटबॉल 2024
- विजेतेपद : स्पेन
- उपविजेतेपद : इंग्लंड
- या स्पर्धेच्या इतिहासात चारवेळा अशी कामगिरी करणारा स्पेन हा पहिला संघ ठरला आहे.
- जर्मनीने 3 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंडच्या संघाला 66 वर्षांच्या इतिहासात एकदाही हे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
- इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या अंतिम सामन्यात संघाने 2-1 असा विजय मिळवत नवा विक्रम रचला.
- 12 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून संघाने युरो चॅम्पियनशिप जिंकली.
- स्पॅनिश संघाने 1964, 2008 आणि 2012 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते
5) जागतिक युवा कौशल्य दिन : 15 जुलै
- जागतिक युवा कौशल्य दिन हा UN द्वारे 2014 मध्ये सुरू केलेला वार्षिक कार्यक्रम आहे.
- थीम 2024 : शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्ये
(Youth Skills for Peace and Development) - या वर्षी शांतता आणि विकासासाठी तरुणांना उच्च कौशल्यावर भर देण्यात आला आहे. उच्च
6) अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर हल्ला
- अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक रॅली घेत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
- त्यांच्या कानाला एक गोळी स्पर्श करून गेली. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.
7) कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना संघ विजेता
- अंतिम स्पर्धेत कोलंबियाचा पराभव
- अर्जेंटीनाचे हे एकूण सोळावे कोपा अमेरिका जेतेपद आहे
- कोपा अमेरिका स्पर्धेमध्ये फक्त दक्षिण अमेरिका यातील देशांचा सहभाग होता. १९९० च्या दशकापासून, उत्तर अमेरिका आणि आशियातील संघांनाही स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे
8) भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने ३५व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये दमदार यश मिळवले.
- एका विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकाविले, तर तीन विद्यार्थ्यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
- पदकविजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
9) सामाजिक भान, कलेची जाण व उद्यामशीलता अंगी बाळगणारे ‘कॅम्लिन फाइन सायन्सेस’चे संस्थापक व ‘कोकुयो कॅम्लिन’चे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे निधन.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel