Current Affairs | चालू घडामोडी | 16 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 16 JUN 2024

1) 16 जून

1.1) 16 जून 1914: सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका

1.2) 16 जून 2010: तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला

2) भारत-पश्चिम आशिया-युरोप मार्गिकेला चालना. पायाभूत प्रकल्पांसाठी ‘जी७’ राष्ट्रे कटिबद्ध असल्याची शिखर परिषदेत चर्चा

  • भारत, पश्चिम आशिया व युरोप यांना जोडणाऱ्या दळणवळण मार्गिकेसारख्या (कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर) ठोस पायाभूत सुविधांच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सात औद्याोगिक राष्ट्रांच्या समूहाने ‘जी-७’ शिखर परिषदेत सांगितले.
  • दक्षिण इटलीतील अपुलिया शहरात ‘जी-७’ परिषद आयोजित केली असून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विशेष निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत उपस्थित राहिले

3) साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

  • बालसाहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार = ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला जाहीर
  • युवा साहित्य अकादमी पुरस्कार = शिवणकाम करीत लेखन करणारे तुळजापूर येथील देविदास सौदागर यांची ‘उसवण’ कादंबरी ला जाहीर
  • देशभरातील २३ साहित्यिकांना युवा पुरस्कार, तर २४ जणांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये १० कवितासंग्रहांचा समावेश आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment