Current Affairs | चालू घडामोडी | 17 FEB 2024
1) राणी गैंडिलिवू पुण्यतिथी = 17 फेब्रुवारी 1993
- नागा चळवळ नेत्या
- वयाच्या सोळाव्या वर्षी जन्मठेप 1935
- राणी पदवी जवाहरलाल नेहरूंनी दिली.
2) कल्याण-लातूर प्रवास केवळ चार तासांत
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण ते लातूर प्रवास सुकर आणि अतिवेगवान करण्यासाठी ४४५ किमीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
- हा द्रुतगती महामार्ग कल्याण येथून सुरू होऊन माळशेज घाटातून पुढे अहमदनगरला जाईल आणि मग पुढे बीड, मांजरसूंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत संपेल.
3) रविचंद्रन अश्विनने कसोटी कारकिर्दीतील बळींचे पंचशतक पूर्ण केले.
- ५०० बळी टिपणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला तर एकुणात 9 वां गोलंदाज
- कसोटीत ५०० बळी मिळवणारे 9 गोलंदाज
- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) : ८००
- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) : ७०८
- जेम्स अँडरसन (इंग्लंड) : ६९६
- अनिल कुंबळे (भारत) : ६१९
- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) : ६०४
- ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) : ५६३
- कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) : ५१९
- नेथन लायन (ऑस्ट्रेलिया) : ५१७
- रविचंद्रन अश्विन (भारत) : ५००
4) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
- त्यानुसार आता शासकीय किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात असलेल्या विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही.
- या बदलामुळे अनेक खासगी शाळांमधील दर्जेदार शिक्षणापासून गोरगरीबांची मुले वंचित राहण्याची शक्यता आहे.
- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के जागा आरक्षित असतात.
- या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून शाळांना दिली जाते. मात्र, कोट्यवधींची प्रतिपूर्ती थकित असल्याने शाळाचालकांमध्ये नाराजी
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel