Current Affairs | चालू घडामोडी | 18 FEB 2024
1)18 फेब्रुवारी
- भारतीय नौसेनेचा उठाव = 18 फेब्रुवारी 1946
- मुंबई येथे तलवार युद्धनौकेवर भारतीय नौसैनिकांनी उठाव केला
- इंडियन होमरूल सोसायटीची स्थापना = 18 फेब्रुवारी 1905
- संस्थापक श्यामजी कृष्ण वर्मा (इंग्लंड)
- इतर कार्य = इंडिया हाऊस, इंडियन सोशॉलॉजिस्ट पत्रिका
2) प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांच्यासह जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
- ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे.
- 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड झाली आहे.
- ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखालील ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी ज्ञानपीठ सन्मानाची घोषणा केली.
- संस्कृत भाषेसाठी हा दुसरा तर उर्दूसाठी पाचवा ज्ञानपीठ पुरस्कार आहे.
- ‘गुलजार’ या नावाने लोकप्रिय असलेले संपूर्ण सिंह कालरा हे आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट उर्दू कवी आहेत. अनोख्या शैलीतील हिंदी चित्रपट गीतांमुळे गुलजार विशेष लोकप्रिय आहेत. काव्यामध्ये त्यांनी त्रिवेणी हा तीन ओळींचा नवा प्रकार शोधला. त्यांनी काव्यातून सृजन संवाद साधला आहे.
- गुलजार यांना 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण पुरस्कार आणि 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले आहेत.
- रामभद्राचार्य हे चित्रकुटावरील तुलसीपीठाचे संस्थापक-प्रमुख आहेत. ते प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरू, शिक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी २४०हून अधिक पुस्तकांची रचना केली आहे. त्यांत चार महाकाव्यांचा समावेश आहे.
- जगद्गुुरू रामभद्राचार्य केवळ दोन महिन्याचे असताना त्यांची दृष्टी गेली.
3) ज्ञानपीठ पुरस्कार माहिती
- सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे. 1961 साली स्थापना आणि सुरवात 1965 ला झाली
- दरवर्षी दिला जातो
- भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 भाषा + इंग्रजी भाषा यांसाठी दिला जातो
- मरणोत्तर दिला जात नाही.
- पहिला ज्ञानपीठ 1965 – मल्याळम लेखक जी शंकर कुरूप
- पहिली महिला ज्ञानपीठ 1976 – बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी
- 1982 पर्यंत हा पुरस्कार एका लेखकाच्या कार्यासाठी दिला जात होता. पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकाच्या एकूण योगदानासाठी ते दिले जाऊ लागले.
- वाग्देवीची (देवी सरस्वती) मूर्ती आणि 11 लाख रुपये मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- 2018 मध्ये, हा पुरस्कार पहिल्यांदा अमिताव घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी देण्यात आला.
- एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती पुढील दोन वर्षांसाठी पुरस्कारासाठी पात्र नसते.
- 2022 चा – दामोदर मावजो कोकणी लेखक यांना प्रदान
4) 2023 सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्रू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित
- ते दोन महिन्यांचे असताना दुर्दैवाने दृष्टिहीन झाले, पण त्याने खचून न जाता त्यांनी आयुष्यभर ज्ञानाचे अग्निहोत्र सतत तेवत ठेवले आहे.
- उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे राहणारे रामभद्राचार्य यांचा जन्म १९५० साली झाला.
- ते रामानंद संप्रदायाचे असून त्यांनी चित्रकूट येथे संत तुलसीदास यांच्या नावे तुलसीपीठ या धार्मिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे.
- जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्र असून त्यांनी जौनपूर येथील आदर्श गौरीशंकर संस्कृत महाविद्यालयात औपचारिक शिक्षण घेतले आहे.
- त्यांनी संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास या विषयांचा अभ्यास केला.
- संयुक्त राष्ट्रांच्या वतीने आयोजित विश्व शांती शिखर संमेलनात जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा समावेश होता.
- जगद्गुरू रामभद्राचार्य हे २२ भाषांमध्ये पारंगत आहेत.
- त्यांनी संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिलीसहित अनेक भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तसेच १०० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
5) संपूर्ण सिंह कालरा म्हणजेच गुलजार यांना 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
- एकेकाळी मोटात गॅरेजमधे काम करून हात काळे करणारा मुलगा पांढऱ्या कागदावर काळीभोर अक्षरे लिहून आज ज्ञानपीठापर्यंत जातो ही तमाम काव्यप्रेमींनाच नाही, तर अखिल विश्वाला आनंद देणारी घटना आहे.
- कवी-शायर, पटकथा लेखक, फिल्म निर्देशक, नाटककार अशी अनेक बिरुदे नम्रतेने बाळगणारा हा माणूस हिंदी, पंजाबी पंजाबी, ब्रज, खड़ी बोली मारवाडी आणि हरियाणवी अशा कोणत्याही भाषेत लिहितो.
- अनोख्या शैलीतील हिंदी चित्रपट गीतांमुळे गुलजार विशेष लोकप्रिय आहेत. काव्यामध्ये त्यांनी त्रिवेणी हा तीन ओळींचा नवा प्रकार शोधला. त्यांनी काव्यातून सृजन संवाद साधला आहे.
- गुलजार यांना 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण पुरस्कार आणि 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले आहेत.
- 2009 साली जय हो या गाण्यासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला आहे.
6) श्रीहरिकोटा येथून इन्सॅट-३ डीएस उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. = 17 फेब्रुवारी 2024
- हा भारताचा सर्वात आधुनिक हवामान उपग्रह आहे. यामुळे हवामानाची व नैसर्गिक संकटांची अचूक माहिती मिळणार आहे.
- इस्रोच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेईकल (जीएसएलव्ही-एफ१४) (नॉटी बॉय हे टोपण नाव) रॉकेटच्या मदतीने इन्सॅट-३ डीएस या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- इन्सॅट-३ डीएस मालिकेत आधीपासून सहा वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह आहेत. आता यामध्ये हा सातवा उपग्रह जोडला गेला आहे.
- या उपग्रहाचा मुख्य उद्देश्य जमीन, समुद्र, हवामान आणि आपत्कालीन सिग्नल यंत्रणा या गोष्टींची माहिती देणे हा आहे. यासोबतच मदत आणि बचावकार्यातही याचे सहकार्य होणार आहे
7) ५७ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा दिनांक २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार
- याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
- यावेळी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
- मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
- राजकपूर जीवनगौरव पुरस्कार
- २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री अरुण इराणी,
- २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि
- २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना
- राजकपूर विशेष योगदान पुरस्कार
- २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता,
- २०२१ साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन
- २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
8) ‘आरटीई’अंतर्गत खासगी शाळांत प्रवेशबंदी नाही : शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे स्पष्टीकरण
- शासकीय शाळा नजीकच्या परिसरात नसल्यास तेथील खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश होणारच आहेत. तसेच त्या प्रवेशापोटी भरपाई देण्याची तरतूदही कायम आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel