Current Affairs | चालू घडामोडी | 19 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 19 FEB 2024

1) 19 फेब्रुवारी

  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती = 19 फेब्रुवारी 1630 (तारखेनुसार)
  • गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचा स्वीकार = 19 फेब्रुवारी 2023
    • वेळ एक मिनिट 41 सेकंद
    • गीतकार कवी राजा बढे
    • संगीतकार श्रीनिवास खळे
    • गायन शाहीर साबळे

2) भारताची यशस्वी कामगिरी. इंग्लंडचा तिसऱ्या कसोटीत ४३४ धावांनी धुव्वा

  • हा भारताचा कसोटीमधील सर्वात मोठा विजय आहे
  • यापूर्वी, न्यूझीलंविरुद्ध २०२१मध्ये ३७२ धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.
  • यशस्वी जैस्वालने कसोटी मालिकेत सर्वाधिक २२ षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. अजूनही दोन सामने शिल्लक आहेत.
  • जैस्वालने आपल्या पहिल्या तिनही कसोटी शतकांचे किमान दीडशतकात रुपांतर केले आहे. तसे करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.
  • सलग सामन्यांत द्विशतक झळकावणारा जैस्वाल हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, विनोद कांबळी व विराट कोहली यांनी अशी कामगिरी केली आहे.

3) आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक

  • भारताने थायलंडचा ३-२ असा पराभव केला.
  • या विजयाने भारतीय महिला संघ उबेर चषकासाठी देखील पात्र ठरला.
  • भारतीय महिला संघाचे हे पहिलेच पदक ठरले.
  • यापूर्वी या स्पर्धेत २०१६ आणि २०२० मध्ये भारतीय पुरुष संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता.

4) शिवरायांचे गडकिल्ले होणार जागतिक वारसास्थळे

  • कोणत्या किल्ल्यांचा होणार समावेश
    1. साल्हेर
    2. शिवनेरी
    3. लोहगड
    4. राजगड
    5. रायगड
    6. प्रतापगड
    7. पन्हाळा
    8. खांदेरी
    9. सुवर्णदुर्ग
    10. विजयदुर्ग
    11. सिंधुदुर्ग
  • सध्या भारतात 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यापैकी 34 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक तर 1 मिश्र स्थळे आहेत.
  • महाराष्ट्रात 6 वारसास्थळे असून त्यातील 5 सांस्कृतिक तर 1 नैसर्गिक आहे
  • महाराष्ट्रातील वारसास्थळे
    • अजिंठा लेणी (1983)
    • वेरूळ लेणी (1983)
    • एलिफंटा लेणी (1987)
    • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (2004)
    • व्हिक्टोरिया गॉथिक मुंबई (2018)
    • पश्चिम घाट – महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ (2022) – नैसर्गिक
  • 2023 मधे जाहीर झालेले वारसा स्थळे
    • 41 वे – शांतिनिकेतन, WB (2023)
    • 42 वे – होयसळ मंदिर समूह, कर्नाटक (2023)

5) UNESCO बाबत

  • संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.
  • स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.
  • या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. 
  • भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

6) जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचं निधन

  • आचार्य विद्यासागर महाराज यांचा जन्म १० ऑक्टोबर १९४६ रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील सदलगा गावात झाला.
  • त्यांनी ३० जून १९६८ रोजी राजस्थानमधील अजमेर शहरात त्यांचे गुरु आचार्यश्री ज्ञानसागर महाराज यांच्याकडून मुनीदीक्षा घेतली.
  • त्यांची कठोर तपश्चर्या पाहून आचार्यश्री ज्ञानसागरजी महाराजांनी त्यांच्यावर आचार्यपदाची जबाबदारी सोपवली होती.
  • त्यांनी आपला संपूर्ण वेळ बुंदेलखंडमध्ये घालवला. आचार्य यांनी जवळपास ३५० दीक्षा दिल्या आहेत.

7) रजनी सातव यांचे निधन

  • राज्याच्या माजी आरोग्य, समाजकल्याण राज्यमंत्री, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अॅड. रजनी शंकरराव सातव (वय ७५) यांचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाले.
  • त्या काँग्रेसचे दिवंगत नेते अॅड. राजीव सातव यांच्या मातोश्री होत्या.

8) रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे महत्त्वाचे विरोधक आणि कठोर टीकाकार अॅलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यु

  • त्यांचा निधनाने रशियात लोकांमधे संताप

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment