Current Affairs | चालू घडामोडी | 17 JULY 2024
1) ऍडम स्मिथ यांचे निधन = 17 जुलै 1790
- जगप्रसिद्ध स्कॉटिश अर्थतज्ञ
- पुस्तक = वेल्थ ऑफ नेशन (1776)
2) एका चेंडूत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम
- भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या 5 व्या T20 मध्ये विश्वविक्रम केला.
- एका चेंडू नंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय संघाने केला.
- झिम्बाब्वे च्या सिकंदर रझाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालने षटकार ठोकला. अंपायरने नो बॉलचा इशारा दिला.
- यानंतर यशस्वीने फ्री हिटवर षटकार ठोकला. म्हणजे एका अधिकृत चेंडूनंतर भारताची धावसंख्या 13 धावा झाली.
- T-20 क्रिकेट मध्ये एका चेंडूनंतर सर्वाधिक धावा करण्याचा हा विश्वविक्रम आहे.
- भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला : यापूर्वी एका चेंडूनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता.
- आज पर्यन्त च्या T – 20 डावातील पहिल्या चेंडूवर सर्वाधिक धावा :
- 13 – भारत विरुद्ध झिम्बाब्वे, 2024
- 9- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, 2023
- 10 – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, 2022
3) मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना – महाराष्ट्र
- महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे.
- या योजनेंतर्गत 60 वर्षांवरील नागरिकांना देशभरातील तब्बल 66 तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार आहेत.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदानही मिळणार आहे.
- मुख्य उद्दीष्ट : राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करुन देणं
- सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
- पात्रता काय ?
१. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक २. वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक
३. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.
4) विक्रम मिसरी यांनी परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला
- माजी परराष्ट्र सचिव मोहन क्वात्रा यांच्या जागी विक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- विक्रम मिसरी हे 1989 च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत.
- विक्रम यापूर्वी देशाचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.
- 2020 मध्ये त्यांची चीनमधील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- ब्रुसेल्स आणि ट्युनिस येथील भारतीय दूतावासात त्यांनी काम केले आहे.
- ते 2014 मध्ये स्पेन आणि 2016 मध्ये म्यानमारमध्ये राजदूत होते.
- विक्रम मिसरी हे तीन पंतप्रधानांचे खाजगी सचिवही राहिले आहेत.
- त्यांनी 1997 मध्ये इंदर कुमार गुजराल, 2012 मध्ये डॉ. मनमोहन सिंग आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काम केले आहे.
5) आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस : 17 जुलै
- आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा (आयसीसी) कार्याचे आणि योगदानाची दखल घेण्याकरीता हा दिवस पाळला जातो.
- हा दिवस 17 जुलै 1998 रोजी रोम परिनियम, ज्या द्वारे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना झाली, त्याच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केला जातो.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel