Current Affairs | चालू घडामोडी |18 AUG 2025
1) १८ ऑगस्ट दिनविशेष
१.१) १९९९: गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई
१.२) १७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म
१.३) १७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म
१.४) १९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म
१.५) १९४५: भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)
१.६) १९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन
२) नेताजी सुभाषचंद्र बोस
- जन्म – २३ जानेवारी १८९७, कटक (ओडिशा)
- शिक्षण – कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज, नंतर इंग्लंडमध्ये ICS परीक्षा उत्तीर्ण
- राजकारणात प्रवेश – काँग्रेसमध्ये; १९३८ व १९३९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष
- विचार – “स्वातंत्र्य भीक मागून नव्हे तर लढून मिळवायचे”
- Forward Bloc ची स्थापना – १९३९
- आजाद हिंद फौज (INA) – सिंगापूर येथे जपानी मदतीने स्थापली
- प्रसिद्ध घोषणा – “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा”
- आझाद हिंद सरकार – १९४३ मध्ये स्थापन
- प्रभाव – ब्रिटिशांना भारत सोडावा लागण्यात INA चा मोठा वाटा
- मृत्यू – १८ ऑगस्ट १९४५ (तैवान विमान अपघात; तरीही रहस्य कायम)

3) AI Driverless Bus in India
- IIT Hyderabad ने आपल्या कॅम्पसमध्ये देशातील पहिली पूर्णपणे AI-आधारित ड्रायव्हरलेस बस सेवा सुरू केली आहे.
- TiHAN (Technology Innovation Hub on Autonomous Navigation) या विशेष केंद्रात विकसित झालेली ही बस भारतात Smart Mobility चं नवं पर्व सुरू करत आहे.
- या अत्याधुनिक बसमुळे –
- कॅम्पस प्रवास होईल अधिक सोयीस्कर
- भारतातील Autonomous Vehicles क्षेत्राला नवी दिशा मिळणार

4) ला. गणेशन – नागालँड राज्यपाल यांचे निधन
- जन्म : 16 फेब्रुवारी 1945, तंजावुर (तमिळनाडू)
- राजकीय कारकीर्द : RSS प्रचारक → BJP नेते, राज्यसभा सदस्य, तमिळनाडू BJP अध्यक्ष
- राज्यपाल पद :
- मणिपुर (2021–23)
- पश्चिम बंगाल (अतिरिक्त, 2022)
- नागालँड (2023–25)
- निधन : 15 ऑगस्ट 2025, वय 80 वर्ष (चेन्नई, अपोलो हॉस्पिटल)
- शोकप्रक्रिया : नागालँडमध्ये 7 दिवसांचा शोक, तिरंगा अर्धस्तंभावर
- विशेष : पदावर असतानाच निधन झालेले पहिले नागालँड राज्यपाल

5) ब्लू घोस्ट लँडर
- ब्लू घोस्ट लँडर हे फायरफ्लाय एरोस्पेसने चंद्रावर वैज्ञानिक पेलोड पोहोचवण्यासाठी विकसित केलेले अंतराळयान आहे .
- ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आणि विविध उपकरणे आणि प्रयोग तैनात करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, ज्यामुळे चंद्राचा वैज्ञानिक शोध पुढे जाईल.
- हे लँडर नासाच्या चंद्र पृष्ठभाग ऑपरेशन्स प्रोग्राम आणि आर्टेमिस मिशनचा भाग असेल, ज्याचा उद्देश मानवांना चंद्रावर परत आणणे आणि शाश्वत शोध स्थापित करणे

6) बॉब सिम्प्सन : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अस्त
- माजी कसोटीपटू, कर्णधार आणि प्रशिक्षक बॉब सिम्प्सन यांचे ८९ व्या वर्षी निधन.
- १९५७-१९७८ या काळात ऑस्ट्रेलियासाठी ६२ कसोटी व २ एकदिवसीय सामने खेळले.
- ३९ कसोटी सामन्यांत कर्णधारपद, कारकिर्दीत ४,८६९ धावा, १० शतके, २७ अर्धशतके, ७१ बळी आणि ११० झेल.
- १९६४ च्या अॅशेस मालिकेत पहिले कसोटी शतक – त्रिशतकाची नोंद.
- १९८६-१९९६ प्रशिक्षकपद – ऑस्ट्रेलियाचा सुवर्णकाळ सुरू. १९८७ चा विश्वचषक विजय
- ४ अॅशेस मालिका जिंकल्या
- स्लिपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – ११० झेल.
- पंतप्रधान अँथनी अल्बानीज व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel