Current Affairs | चालू घडामोडी | 18 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 18 JUN 2024

1) झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी = 18 जून 1858

 • नाव = मनकर्निका नेवाळकर
 • 1857 च्या उठावात प्रमुख भूमिका
 • झाशी इंग्रज अधिकारी = हुज रोझ (1857)

2) शिवरायांची वाघनखे जुलैमध्ये भारतात

 • हिंदवी स्वराज्याच्या सातारा या चौथ्या राजधानीतील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये येत्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात शिवाजी महाराजांनी शौर्य दाखवले ती वाघनखे इंग्लंडच्या म्युझियममधून आणण्यात येणार आहेत.
 • जनतेच्या भावना जोडलेला हा ऐतिहासिक अनमोल ठेवा सलग दहा महिने पहाण्यास उपलब्ध राहणार असून, त्याचे इतिहास संशोधक व शिवप्रेमींमध्ये अप्रूप राहणार आहे.

3) लोकसभाध्यक्षांची बिनविरोध निवडीची परंपरा भंगण्याची शक्यता

 • जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यास भाग पाडल्यास, स्वतंत्र भारताच्या इतिहासात अध्यक्षपदाची पहिलीच निवडणूक असेल.
 • आतापर्यंत लोकसभाध्यक्ष नेहमीच एकमताने निवडले गेले. लोकसभेतील वाढलेल्या संख्याबळामुळे खूश झालेली इंडिया आघाडी आता आक्रमकपणे उपाध्यक्ष पदाची मागणी करत आहे
 • 19 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जून रोजी सुरू होणार असून त्यादरम्यान कनिष्ठ सभागृहाचे सदस्य शपथ घेतीलआणि सभापती निवडले जातील

4) ‘शक्तिपीठ’ महाराष्ट्रापेक्षा गोव्याच्या भल्याचा! किसान सभेने नियुक्त केलेल्या समितीचा निष्कर्ष

 • प्रस्तावित नागपूर-गोवा (शक्तिपीठ) द्रुतगती मार्ग महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी नाही. त्याचा लाभ गोवा राज्याला आणि दारू व जुगारासाठी तेथे जाणाऱ्या पर्यटकांना होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जाईल हा निष्कर्ष अखिल भारतीय किसान सभेने नियुक्त केलेल्या न्या. नलावडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने आपल्या अहवालात मांडला आहे.
 • प्रस्तावित मार्गामुळे नागपूर ते गोवादरम्यानचा प्रवास ११०० कि.मी. वरून ८०२ कि.मी. वर येईल तसेच प्रवासाचा कालावधी सात तासांत पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे.

5) स्विस परिषदेत युक्रेनबाबतच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यास भारताने नकार दिला

 • 15 आणि 16 जून रोजी स्वित्झर्लंडने बर्गनस्टॉक येथे दोन दिवसीय युक्रेनमधील शांतता परिषदेचे आयोजन केले होते.
 • अनेक देशांनी युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेचे समर्थन केले आणि सर्व पक्षांना संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आवाहन केले
 • मात्र या परिषदेत रशिया ची अनुपस्थिती होती. दोन्ही पक्षांना शांतता तोडगा मान्य असल्यास या प्रदेशात शाश्वत शांतता नांदू शकते, असे भारताने म्हटले आहे
  • रशियाच्या सहभागाशिवाय या प्रदेशात शांतता नांदू शकत नाही, अशी भारताची भूमिका होती
  • रशियाचा दृष्टिकोन लक्षात न घेता हा जाहीरनामा जारी करण्यात आल्याने भारताने या पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment