Current Affairs | चालू घडामोडी | 2 व 3 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 2 व 3 OCT 2023

CURRENT AFFAIRS

2 ऑक्टोबर – जागतिक अहिंसा दिवस

1) बिहार राज्याने जातनिहाय पाहणी अहवाल प्रसिद्ध केला.

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा अहवाल सादर केला.
  • बिहारमध्ये OBC ची संख्या 63.1% असून त्यात अतिमागास (EBC) 36% आहेत.
  • ही टक्केवारी मंडळ आयोगाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे.
  • जातनिहाय पाहणी करणारे ‘बिहार’ हे पहिलेच राज्य ठरले आहे.
  • केंद्र सरकारने OBC चा आढावा घेण्यासाठी ‘रोहिणी’ आयोग स्थापन केलेला असून अद्याप त्याचे आकडे जाहीर केलेले नाहीत.

2) नोबेल पुरस्कार 2023- ‘वैद्यकशास्त्र’

  • कॅटलिन करिको (हंगेरीयन अमेरिकन) व ड्र् वेइसमेन (अमेरिकन) यांना जाहीर.
  • कोविड -19 लशीच्या संशोधनासाठी त्यांना जाहीर. त्यांनी m-RNA लशीची निर्मिती केली होती.

3) मालदीवमध्ये सत्ताबदल.

  • ‘प्रोग्रेसीव अलायन्स’ पार्टीचे नेते ‘मोहम्मद मुईझ्झू’ यांनी ‘आलदेवियन डेमोक्रॅटिक पक्षाचे’ नेते इब्राहीम सोली यांचा पराभव केला.
  • ‘मोहम्मद मुईझ्झू’ हे भारतविरोधी असल्याचे मानले जातात.

4) सप्टेंबर महिन्यात ‘1.63 लाख कोटींचे’ GST संकलन.

  • यंदा 10.2% वाढ.
  • आजवरचे ‘1.87 लाख कोटी’ इतके सर्वाधिक GST संकलन एप्रिल 2023 मध्ये झाले होते.

5) आशियाई क्रीडा स्पर्धा, 2023

  • बीडच्या अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मी स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक.
    • आशियाई क्रीडा मधील या प्रकारातील भारताचे आजपर्यंतचे पहिले सुवर्णपदक.
    • तसेच त्याने आशियाई क्रीडामधील विक्रमही स्वत:च्या नावे नोंदवला. – 8 मि. 19.50 सेकंद.
  • गोळाफेकमध्ये ‘तजिंदरपाल सिंग’ ने सुवर्णपदक पटकावले.
  • ट्रॅप नेमबाजी प्रकारात पुरुष संघाने सुवर्णपदक पटकावले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment