Current Affairs | चालू घडामोडी | 20 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 20 JUN 2024

1) सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना = 20 जून 1946

 • स्थळ = मुंबई
 • संस्थापक = डॉ बाबासाहेब आंबेडकर

2) 2025 हे “क्वांटम ॲडव्हान्समेंट” वर्ष

 • युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 2025 हे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे.
 • 7 जून 2024 रोजी, 193-सदस्यीय असेंब्लीने घाना आणि इतर सहा देशांनी सह-प्रायोजित केलेला ठराव संमत केला
 • 1925 साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वर्नर हायझेनबर्ग यांनी आधुनिक क्वांटम मेकॅनिक्सचा पाया घालणारा पेपर प्रकाशित केले. या घटनेला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत.
 • क्वांटम मेकॅनिक्सच्या निर्मितीसाठी वर्नर हायझेनबर्ग यांना 1932 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले
 • मागील वर्षे
  • 2023 = भरडधान्य वर्ष
  • 2024 = उंटांचे वर्ष

3) भारताचे राष्ट्रीय क्वांटम मिशन = एप्रिल 2023

 • 2023 ते 2031 पर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) द्वारे राबविण्यात येणार आहे.
 • यात चार गोष्टी अंतर्भूत आहेत
  1. क्वांटम कम्प्युटिंग,
  2. क्वांटम कम्युनिकेशन,
  3. क्वांटम सेन्सिंग आणि मेट्रोलॉजी
  4. क्वांटम मटेरियल्स आणि उपकरणे

4) 2024-25 च्या खरीप हंगामासाठी 14 नवीन पिकांना MSP वाढ

 • नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय
 • कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (CACP) शिफारशी मान्य
 • MSP = Minimum Support Price (किमान आधारभूत किंमत)
 • तांदूळ, ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, कापूस या पिकांसाठी MSP वाढ जाहीर

5) ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारत 63 व्या स्थानी.

 • स्वीडन अव्वल.
 • चीन 20 व्या क्रमांकावर
 • अहवाल = World Economic Forum (WEF)

6) नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचे उद्घाटन

 • देशातील उच्च शिक्षण प्रणाली अधिक प्रगत आणि संशोधनाभिमुख करण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले
 • देशात सध्या २३ आयआयटी तर २१ आयआयएम आहेत. दहा वर्षांपूर्वी ही संख्या १३ होती. तसेच एम्सही २२ असून दहा वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाल्याने पंतप्रधानांनी स्पष्ट केले
 • प्राचीन नालंदा विद्यापीठ हे पाचव्या शतकापासून अस्तित्वात असून, जगभरातील विद्यार्थी येथे अध्ययनाला येत असत. ८०० वर्षे त्याची भरभराट झाल्यानंतर १२ व्या शतकात आक्रमकांनी उद्ध्वस्त केले होते

7) ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ची पुन्हा चर्चा

 • महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) व महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विकसित मराठवाडा २०४७’ या विषयावरील चर्चासत्रात ३४ हजार कोटी रुपयांच्या वॉटर ग्रीड योजनेसाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याची तयारी सुरू आहे.
 • मात्र, आता ही योजना केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केली जाईल
 • पूर्वी या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल इस्रायलमधील वॉटर ग्रीडच्या धर्तीवर करण्यात आला होता.
  • मेकारोट या कंपनीबरोबर २०१८ मध्ये करार करण्यात आले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हानिहाय निविदा प्रसिद्ध करण्यास सुरुवात करण्यात आली होती.
  • राज्य सरकार बदलले आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आला होता

8) अमेरिकेचे शिष्टमंडळ दलाई लामांच्या भेटीला

 • चीनचा विरोध डावलून धर्मशाळा येथे दौरा
 • धर्मशाळा येथील मध्यवर्ती तिबेटी प्रशासनाच्या (सीटीए) मुख्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान ‘हाऊस’च्या माजी सभापती नॅन्सी पॅलोसी, सदस्य मॅरिनेट मिलर, ग्रेगरी मिक्स, निकोल मॅलियोटॉकिस, जिम मॅकगनवर्न आणि ॲमी बेरा हे काँग्रेस सदस्य उपस्थित होते
 • ‘तिबेट चीनचा भाग नाही’
  • १३व्या शतकापासून तिबेट चीनचा भाग असल्याचा खोटा दावा करण्यात येत आहे. मात्र तिबेटचे नागरिक, दलाई लामा आणि अमेरिका व तिचे नागरिक अशा सर्वांनाच तिबेट हा चीनचा भाग नसल्याचे माहित असल्याचे मॅकॉल म्हणाले.
  • अमेरिकन काँग्रेसने तिबेटबाबत विधेयक पारित केले असून त्यानुसार तिबेटी नागरिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment