Current Affairs | चालू घडामोडी | 21 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 21 DEC 2023

1) नवी फौजदारी विधेयके लोकसभेत मंजूर.

1) भारतीय न्याय (दुसरे) संहिता 2023
2) भारतीय नागरिक सुरक्षा (दुसरे) संहिता 2023
3) भारतीय साक्ष्य (दुसरे) विधेयक 2023

2) ‘कृष्णात खोत’ यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार.

  • ‘प्रकाश पर्येकर’ यांच्या कोकणी भाषेतील ‘वर्सल’ कथासंग्रहाला कोकणी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार
  • नागपूरकर लेखक ‘डॉ. विनोद आसुदानी’ यांना ‘हथु पकिडजांइ’ या पुस्तकासाठी ‘सिंधी’ भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. विशेष बाब म्हणजे ते अंध असून ‘अंध लेखकाला’ मिळणारा हा पहिलाच साहित्य अकादमी पुरस्कार आहे.
  • 24 भाषांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

3) सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या दोघांना 2023 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर.

  • मोहम्मद शमी = अर्जुन पुरस्कार
  • साताऱ्याची तिरंदाज आदिती स्वामी आणि तिचा सहकारी ओजस देवताळे यांना ‘अर्जुन’ क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • एकूण 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर
  • निवृत्त न्यायाधीश ए. एम.खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विजेत्या खेळाडूंची निवड केली
  • दरवर्षी राष्ट्रीय क्रीडादिनी म्हणजेच २९ ऑगस्टला या पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र, या वेळी ९ जानेवारीला राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या क्रीडापटूंचा गौरव केला जाणार आहे.
  • मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी

(बॅडमिंटन)

  • द्रोणाचार्य (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब).
  • द्रोणाचार्य (जीवनगौरव) : जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस).
  • मेजर ध्यानचंद जीवनगौरव : मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी).
  • अर्जुन पुरस्कार : ओजस देवताळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाला, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बोल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग).

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment