Current Affairs | चालू घडामोडी | 22 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 22 SEPT 2024

1) 22 सप्टेंबर दिनविशेष

1.1) पवनकुमार चामलिंग यांचा जन्म

  • मुख्यमंत्री = सिक्कीम राज्य
  • सर्वाधिक काळ मुख्यमंत्री (24 वर्ष)
  • पक्ष = सिक्कीम डेमॉक्रॅटिक फ्रंट

1.2) 22 सप्टेंबर 1887 = कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

  • रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक
  • कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात मराठी जैन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील.
  • महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.
  • भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला.
  • सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
  • भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले.

2) WHO द्वारे जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश घोषित -जॉर्डन

  • जॉर्डनची राजधानी – अम्मान
  • कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे.( मायको बॅक्टेरियम लेप्री)
  • कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात.
  • प्रभावित अंग -त्वचा
  • जॉर्डन चे नवीन पंतप्रधान – जाफर हसन

3) आतिशी मार्लेना दिल्लीच्या 8 व्या मुख्यमंत्री

  • दिल्लीच्या त्या सर्वात तरुण मुख्यमंत्री (43 वय) आहेत
  • दिल्लीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी महिला
  • दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

4) श्रीलंकेच्या राजकारणाला ऐतिहासिक वळण

  • राष्ट्राध्यक्षपदी डाव्या विचारांचे अनुरा कुमारा दिसानायके विजयी

5) राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीही महामंडळ

  • सामाजिक न्याय विभागाकडून अखेर मोहोर, पन्नास कोटी रुपयांची तरतूद
  • महामंडळाची रचना
  • ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे मुख्यालय मुंबईत.
  • महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती.
  • महामंडळाचे भागभांडवल ५० कोटी.
  • महामंडळाकरीता आवश्यक पदनिर्मिती, आर्थिक तरतूद व स्वतंत्र लेखाशीर्ष याबाबत विभागाकडून स्वतंत्र कार्यवाही

6) जागतिक बांबू दिन :18 सप्टेंबर

  • जागतिक बांबू दिन, 18 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो, हा बांबूच्या अविश्वसनीय फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 2009 मध्ये जागतिक बांबू संघटनेने (WBO) तयार केलेला एक उपक्रम आहे.
  • 2017 मध्ये भारतीय वन कायदा, 1927 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि बांबूला झाडाच्या श्रेणीतून काढून टाकण्यात आले. आता जंगलाबाहेरही बांबूची झाडे वाढण्यास किंवा तोडण्यास मनाई नाही.
  • इतिहास: जागतिक बांबू संघटनेने (WBO) 2009 मध्ये बँकॉक येथे आठव्या जागतिक बांबू काँग्रेस दरम्यान 18 सप्टेंबर हा जागतिक बांबू दिन म्हणून घोषित केला.

7) मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी संख्येची अट

  • पदनिश्चितीच्या प्रचलित धोरणामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्यासाठी राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निश्चित करण्याबाबतचा निर्णय १५ मार्च २०२४ रोजी घेतला होता.
  • त्यात मुख्याध्यापक पदासाठी १५० विद्यार्थिसंख्या निश्चित करण्यात आली होती.
  • मात्र या निर्णयाला राज्यभरातून विरोध करण्यात आला. त्यानंतर त्यात आता सुधारणा करून मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी असणे आवश्यक, तर पूर्वीच्या मंजूर पदांस संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थिसंख्या ९० असणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment