Current Affairs | चालू घडामोडी | 07 MAY 2024
1) 7 मे
1.1) 100 वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर = 7 मे 2015
- भारत व बांगलादेश या दोन देशांमध्ये भूसीमा करार
1.2) बेथून कॉलेज ची स्थापना = 7 मे 1879
- स्थळ = कलकत्ता
- आशियातील सर्वात जुने महिला कॉलेज
1.3) रवींद्रनाथ टागोर जयंती = 7 मे 1861
- शांतिनिकेतन आश्रम स्थापना = 1901
- साहित्यातील नोबेल= 1993
- 3 राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिले= भारत, बांगलादेश, श्रीलंका
- काव्यसंग्रह = गीतांजली
- जालियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून सर पदवी परत केली = 1919
2) सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा जाणार अंतराळात
- बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळात जाण्यासाठी सुनीता विल्यम्स सज्ज झाल्या आहेत. ही त्यांची तिसरी अंतराळ फेरी असेल
- ही मोहीम यशस्वी झाली तर मस्कच्या ‘स्पेस एक्स’च्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला क्रू वाहतूक उपलब्ध करून देणारी स्टारलाइनर दुसरी खासगी कंपनी ठरेल.
- डॉ. दीपक पांड्या आणि बोनी पांड्या यांच्या पोटी जन्मलेल्या सुनीता विल्यम्स यांची निवड १९९८ मध्ये नासामध्ये झाली.
- २००६ आणि २०१२ मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता.
- या दोनही मोहिमांमध्ये एकूण ३२२ दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते. हा विक्रम मानला जात आहे.
- अंतराळ स्थानकावर असताना त्यांनी एकूण २९ तास आणि १७ मिनिटे चार स्पेसवॉक करणारी पहिली महिला होऊन महिलांसाठी जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
3) पूर्णिमा देवी बर्मन यांना ‘ग्रीन ऑस्कर’ व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 ने सन्मानित
- आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांना धोक्यात असलेल्या ग्रेटर ॲडज्युटंट स्टॉर्क आणि त्याच्या पाणथळ अधिवासाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने केलेल्या अनुकरणीय संवर्धन प्रयत्नांसाठी प्रतिष्ठित व्हिटली गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- या पुरस्काराला बऱ्याचदा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते. हा पुरस्कार वन्यजीव संवर्धनातील तिच्या उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकते आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी तळागाळातील प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करते.
4) आरोपीला अन्य एका प्रकरणात अटक झाल्यावर दुसऱ्या प्रकरणात अटकपूर्व जामीन देता येईल का, या कायदेशीर प्रश्नावर विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज मान्य केले.
5) संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून BSNL ऑगस्टमध्ये संपूर्ण भारतात 4G सेवा सुरू करणार आहे.
- BSNL अधिकाऱ्यांनी 4G नेटवर्कवर 40-45 मेगाबिट प्रति सेकंदाचा सर्वोच्च वेग नोंदवल्याचा दावा केला आहे.
6) चेन्नईस्थित सेमीकंडक्टर कंपनी ‘माइंडग्रोव्ह’ ने आयआयटी मद्रास च्या साहाय्याने भारतातील पहिली व्यावसायिक MCU चिप लाँच केली.
7) कार्बन फार्मिंग म्हणजे काय ?
- ही एक पुनर्जन्मशील कृषी पद्धती आहे जी पर्यावरणाचे आरोग्य पुनर्संचयित करते आणि कृषी उत्पादकता आणि मातीचे आरोग्य सुधारते आणि कृषी परिसंस्थेमध्ये कार्बन साठवणूक क्षमता वाढवून आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून हवामान बदल कमी करते.
- कार्बन फार्मिंगची सोपी अंमलबजावणी म्हणजे रोटेशनल ग्रेझिंग. याव्यतिरिक्त यामध्ये कृषी वनीकरण, संवर्धन शेती, एकात्मिक पोषक व्यवस्थापन, कृषी-परिस्थिती, पशुधन व्यवस्थापन आणि जमीन पुनर्संचयन यांचा समावेश होतो.
- कार्बन शेतीला प्रोत्साहन देणे हे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे मातीचे आरोग्य सुधारणे, जैवविविधता वाढवणे आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांसाठी आर्थिक संधी निर्माण करताना हवामानातील बदल कमी करणे या सर्व गोष्टी देखील साध्य होतील
8) वीस लाख प्रकाश वर्षे अंतरात पसरलेल्या दुर्मीळ रेडिओ स्राोताचा शोध
अद्यायावत जीएमआरटीच्या साहाय्याने भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन
- एबल २१०८ या दीर्घिका समूहात २० लाख प्रकाश वर्षे अंतरात पसरलेल्या दुर्मीळ रेडिओ स्रोताचा शोध घेण्यात भारतीय खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे.
- अद्ययावत केलेल्या जायंट मीरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (यू-जीएमआरटी) साहाय्याने हे संशोधन करण्यात आले असून, येत्या काळात दीर्घिका समूहांची निर्मिती आणि उत्क्रांतीच्या घटनाक्रमाचा अभ्यास करण्यासाठी हा शोध उपयुक्त ठरणार आहे
- दीर्घिका समूह ही विश्वात आकाराला आलेली सर्वांत मोठी गुरुत्वाकर्षणाने बांधलेली रचना मानली जाते. दीर्घिका समूहाचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या हजार ट्रिलियन पट जास्त असते.
- या समूहांमधील विद्युतभारित कण दोन समूहांची टक्कर होऊन ऊर्जावान होतात. ऊर्जावान कण चुंबकीय क्षेत्रामध्ये रेडिओ वर्णपटात उत्सर्जन करतात
9) RTE कायद्यातील बदलांना स्थगिती. निर्णय कायद्याच्या विरोधातील असल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी
- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळांना वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली
- ‘आरटीई’अंतर्गत राखीव आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांमधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमीच्या परिघात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे परिपत्रक राज्य शासनाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये काढले होते. त्यामुळे नामांकित खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याचा या विद्यार्थ्यांचा मार्गच बंद झाला होत
10) विकासदर चालू वर्षात ७.१ टक्क्यांवर – इंडिया रेटिंग्ज
- इंडिया रेटिंग्ज ने वर्तविलेला सुधारित अंदाज हा चालू आर्थिक वर्षातील विकास दराच्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन अनुमानापेक्षा थोडा जास्त आहे.
11) कोव्हिशिल्ड लशीच्या दुष्परिणामांचा धोका कमी
- ब्रिटनमधील ॲस्ट्राझेनेका कंपनीने त्यांच्या करोनावरील लशीमुळे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) दुष्परिणाम होऊ शकतात, असे म्हटले आहे.
- टीटीएस ही दुर्मीळ आणि अतिशय गंभीर स्थिती मानली जाते. यात व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात. या गुठळ्या मेंदूत आणि पोटात होतात.
- याच कंपनीची करोनावरील लस कोव्हिशिल्ड या नावाने भारतात देण्यात आली.
- ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीशी भागीदारी करून ही लस विकसित करण्यात आली होती.
- भारतात सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड नावाने ही लस उत्पादित केली.
12) 2024 पुलित्झर्स पुरस्कार
- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने 7 मे 2024 रोजी पुलित्झर पुरस्कार 2024 विजेत्यांची घोषणा केली
- पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. हे पुरस्कार 15 पत्रकारिता श्रेणी आणि आठ कला श्रेणींमध्ये कामासाठी देतात
- पुरस्कार यादी
- पत्रकारिता श्रेणी
- सार्वजनिक सेवा – Pro Publica (कॅलिफोर्निया)
- अन्वेषणात्मक अहवाल – हॅना ड्रेयर (द न्यूयॉर्क टाइम्स)
- पुस्तक नाटक आणि संगीत श्रेणी
- काल्पनिक कथा – नाईट वॉच (अमेरिकन कादंबरीकार जेन ॲन फिलिप्स यांनी ही कादंबरी लिहिली आहे.)
- पुलित्झर पारितोषिक
- पुरस्काराची स्थापना = जोसेफ पुलित्झर यांनी
- त्यांनी 1904 मध्ये पत्रकारिता, कला आणि संस्कृतीतील उत्कृष्टतेसाठी प्रोत्साहन म्हणून पुलित्झर पुरस्काराची स्थापना केली
- पहिला पुरस्कार 1917 मध्ये प्रदान करण्यात आला
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel