Current Affairs | चालू घडामोडी | 23 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 23 SEPT 2024

1) 23 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 23 सप्टेंबर 1884 = बॉम्बे मिलहॅण्ड असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन

  • संस्थापक = नारायण मेघाजी लोखंडे
  • पहिली सभा = परळ, मुंबई

2) बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने खुल्या आणि महिला ह्या दोन्ही गटात अव्वल रहात दुहेरी सुवर्णपदके मिळवली.

  • महिला संघ : हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव आणि अभिजित कुंटे (कर्णधार).
  • खुला संघ: गुकेश डी, प्रज्ञानंधा आर, अर्जुन एरिगाईसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन (कर्णधार).
  • दोन वर्षांपूर्वी, चेन्नईजवळील ममल्लापुरम येथे ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आले होते तेव्हा भारताने ओपन आणि महिला अशा दोन्ही प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.

3) 23 वा कायदा आयोग (Law Commission)

  • 2 सप्टेंबर रोजी अधिसूचित करण्यात आले होते, 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत, हा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून घेतला जाईल

4) भारताकडून क्षेपणास्त्रांची चाचणी

  • भारताने सलग दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) ‘व्हर्टिकल लाँच शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल’ (VLSRSAM) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

5) राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आता सीबीएसई अभ्यास पॅटर्न

  • 2025 – 26 या शैक्षणिक वर्षापासून लागू : शिक्षणमंत्री केसरकर यांची माहिती

6) प्रतापगड संरक्षित स्मारक घोषित

  • साताऱ्यातील प्रतापगड (ता. महाबळेश्वर) हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून राज्य शासनाने घोषित केले आहे. लवकरच युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादीत प्रतापगडचे नामांकन करण्यासाठी त्यांचे पथक गडावर येणार आहे.

7) ‘आर्मी डे परेड’चा पुण्याला मान

  • भारतीय लष्कराच्या स्थापना दिवसानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ह्यआर्मी डे परेडचा मान पुण्याला मिळाला आहे.
  • लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे येत्या १५ जानेवारीला पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे
  • स्वातंत्र्यानंतर १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराची स्थापना झाली होती. या दिवशी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून १५ जानेवारीला आर्मी डे साजरा करण्यात येतो
  • सन २०२३ मध्ये आर्मी डे परेड पहिल्यांदाच दिल्लीबाहेर बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर २०२४ मध्ये ती उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाली. आता २०२५ची आर्मी डे परेड पुण्यात आयोजित केली जाणार आहे

8) लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर 2025 साठी भारताची अधिकृत एंट्री असणार आहे.

9) मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा किताब पटकावणारी रिया सिंघ

  • रिया सिंघ ही गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे.
  • रिया तिचे शिक्षण जीएसएल युनिव्हर्सिटी, गुजरात येथून घेत आहे.
  • यावर्षी मेक्सिकोमध्ये ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
  • भारताला शेवटचा मिस युनिव्हर्सचा किताब 2021 मध्ये मिळाला होता.
  • त्यावेळी हा ताज हरनाज सिंधू हिने जिंकला होता.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment