Current Affairs | चालू घडामोडी | 24 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 24 JUN 2024

1) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती नियुक्त = 24 जून 2017

 • अध्यक्ष = के कस्तुरीरंगन

2) ‘जीपीएस कनेक्ट’मुळे विनाचालक ट्रॅक्टर पेरणी

 • जर्मन तंत्रज्ञानाचा राज्यात पहिलाच प्रयोग
 • अकोला जिल्ह्यातील एका तंत्रस्नेही शेतकऱ्याने ‘जीपीएस कनेक्ट’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी केली आहे. जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा राजू वरोकार यांनी केला.

3) शक्तिपीठ महामार्ग

 • पवनार ते पत्रादेवी म्हणजे नागपूर ते गोवा असा ८०२ किलोमीटरचा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग
 • १२ जिल्ह्यांतील ३५ तालुक्यांमधील २८ हजार एकर भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्धीस देण्यात आले होते
 • अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती टी. एस. नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती शक्तिपीठ महामार्गाची गरज आणि आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी नेमली. या समितीने हा मार्ग व्यवहार्य नसल्याचे निष्कर्ष काढले.

4) वाढवण बंदर

 • देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ पाहता भविष्याच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या बंदराची उभारणी आवश्यक ठरली
 • वाढवण येथे १८ ते २० मीटरची नैसर्गिक खोली प्राप्त असून २४ हजार कंटेनर क्षमतेपेक्षा अधिक जहाजांची बंदरात नांगरणी शक्य होईल; त्यामुळे भारताचे सिंगापूर, कोलंबो व इतर आंतरराष्ट्रीय बंदरांवरील अवलंबित्व संपुष्टात येईल.
 • शिवाय वाढवण हे ‘इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ व ‘इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्स्पोर्टशन कॉरिडॉर’ या आंतरराष्ट्रीय नौकानयन मार्गांलगत असल्याने आयात- निर्यातीसाठी सोयीचे ठिकाण ठरेल.
 • बंदरामुळे प्रत्यक्ष १२ लक्ष व अप्रत्यक्ष एक कोटी रोजगार निर्मिती होऊन पालघर जिल्ह्याचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) तिपटीने वाढेल असा दावा करण्यात येत आहे. त्याच बरोबरीने पालघर, डहाणू तालुक्यातील स्थानिकांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचे कामकाज मिशन मोडवर हाती घेण्यात येणार आहे.

5) पॅट कमिन्सने सलग दोन सामन्यांत 2 हॅटट्रिक घेऊन इतिहास रचला

 • T-20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज.
 • पॅट कमिन्सने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत हॅट्ट्रिक साधली.  यासह त्याने टी-20 विश्वचषकात इतिहास रचला.
 • T – 20 विश्वचषक 2024  सामन्यात पॅट कमिन्सने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक साधली होती.
 • याआधी सलग दोन हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम कोणत्याही गोलंदाजाला करता आला नव्हता

6) पन्नालाल सुराणा यांना शाहू पुरस्कार जाहीर

 • यंदाचा प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जाहीर करण्यात आला आहे.
 • 1984 पासून हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा 38 वा पुरस्कार आहे.
 • 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे

7) समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर केरळमधील कोझिकोडला अधिकृतपणे भारताचे पहिले युनेस्को ‘सिटी ऑफ लिटरेचर’ म्हणून घोषित करण्यात आले


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment