Current Affairs | चालू घडामोडी | 24 NOV 2023
1) बिहारच्या धर्तीवर राज्य सरकार वाढविणार आरक्षणाची टक्केवारी.
- बिहार आरक्षण सध्या
- बिहार मध्ये आरक्षण कोटा 50% वरून 65% करण्यात आला आहे
- म्हणजे बिहार मध्ये सध्या 65%+10%EWS एकूण = 75% आरक्षण आहे
- महाराष्ट्र आरक्षण सध्या..
- अनुसूचित जाती 13% आरक्षण
- अनुसूचित जमाती 7% आरक्षण
- इतर मागासवर्ग 19% आरक्षण
- विशेष मागास प्रवर्ग 2%आरक्षण
- विमुक्त जाती अ 3% आरक्षण
- भटक्या जाती ब 2.5% आरक्षण
- भटक्या जाती क 3.5% आरक्षण
- भटक्या जाती ड 2% आरक्षण
- EWS 10% आरक्षण
- 52% + 10% EWS
- महाराष्ट्र एकूण आरक्षण : 62%आरक्षण
2) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे 96 व्या वर्षी कोल्लम (केरळ) येथे निधन झाले आहे.
- 1983 मध्ये त्या केरळ उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झाल्या हा टप्पा गाठणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश होत्या.
- 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.
- जयललिता 1997 – 2001 या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणूनही काम केले.
3) विधेयके रोखून धरणे गैर = सर्वोच्च न्यायालयाचे मत
- अनुच्छेद 200 नुसार विधेयकांबाबत राज्यपालांकडे तीन पर्याय आहेत
- विधेयकाला मंजुरी देणे
- विधेयकावर मंजुरी नाकारणे
- विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे
- अनुच्छेद 200 नुसार राज्यपाल विधेयकाच्या फेरविचाराच्या आवश्यकतेच्या संदेशासह संबंधित विधेयक विधिमंडळाकडे परत पाठवू शकतात. मात्र विधिमंडळाने दुरुस्तीसह किंवा दुरुस्ती विना विधेयकास पुन्हा मंजुरी दिल्यास त्यावर स्वाक्षरी करणे राज्यपालांना बंधनकारक आहे.
- राज्यपालांनी विधेयके प्रलंबित ठेवल्यास पुढील प्रक्रिया कशी असेल याबाबत राज्यघटनेच्या अनुच्छेद 200 मध्ये स्पष्टता नसल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.
4) वकील सोमशेखर सुंदरसन उच्च न्यायालयात नियुक्त.
- सुंदरसन यांच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या 68 झाली आहे.
5) गदिमा पुरस्कार सानिया यांना जाहीर.
- अपर्णा अभ्यंकर यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार
- प्रसिद्ध कवी गीतकार वैभव जोशी यांना चैत्रबन पुरस्कार
- युवा गायिका स्वरदा गोखले-गोडबोले यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार
6) राज्यांतील शाळांमध्ये आता ‘वाचन चळवळ’
7) डॉ. एस एस बद्रीनाथ यांचे 83 व्या वर्षी निधन.
- शंकर नेत्रालयाची स्थापना त्यांनी केली होती.
- 1978 मध्ये चेन्नईमध्ये सुरू झालेले शंकर नेत्रालय हे भारतातले सगळ्यात मोठे आणि ‘ना नफा आणि ना तोटा’ तत्त्वावर चालणारे नेत्र रुग्णालय आहे.
- 1983 मध्ये त्यांना पद्मश्री तर 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel