Current Affairs | चालू घडामोडी | 29 APR 2024
1) पंचशील करार = 29 एप्रिल 1954
- देश = भारत व चीन
2) प्रकल्प आकाशतीर
- भारतीय लष्कराने ‘प्रोजेक्ट आकाशतीर’ अंतर्गत नियंत्रण आणि अहवाल प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली.
- विकसित : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) द्वारे
- उद्दिष्ट
- सैन्याच्या हवाई संरक्षण प्रणालीची परिचालन कार्यक्षमता आणि एकात्मता वाढवणे
- ‘प्रोजेक्ट आकाशतीर’ हा डिजिटलायझेशनद्वारे हवाई संरक्षण नियंत्रण आणि अहवाल प्रक्रिया स्वयंचलित करण्याचा एक अग्रगण्य प्रयत्न आहे
- यामुळे भारतीय लष्कराची संवाद क्षमताही वाढेल.
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड :
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली नवरत्न कंपनी आहे.
- स्थापना : त्याचा पहिला कारखाना बंगळुरू येथे 1954 साली स्थापन झाला.
- उद्दिष्ट : देशात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि प्रणाली विकसित करणे आणि त्यांचे उत्पादन करणे
- 2024 हे सैन्याच्या तांत्रिक एकत्रीकरणाचे वर्ष असेल:
- आधुनिकीकरणाच्या नव्या युगाशी ताळमेळ राखण्यासाठी लष्कराने 2024 हे वर्ष ‘Year of Technological Absorption’ म्हणून घोषित केले आहे.
- भारतीय लष्कर विशिष्ट तंत्रज्ञान आणि यंत्रणांच्या समावेशाला गती देत आहे.
3) भारताच्या कृषी निर्यातीत घट का झाली?
- देशात शेतमालाच्या उत्पादनात सतत वाढ होत आहे. तरीही आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशातून होणाऱ्या कृषी निर्यातीत घट झाली आहे
- कृषी निर्यात घटली म्हणजे किती?
- आर्थिक वर्ष 2023-24मध्ये देशाच्या कृषी निर्यातीत 8.8 टक्क्यांनी घट होऊन ती 43.7 अब्ज डॉलरवर आली आहे.
(2022-23 = 47.9) - ‘अपेडा’च्या कृषी निर्यातीतही 6.85 टक्क्यांनी घट झाली आहे
- आर्थिक वर्ष 2023-24मध्ये देशाच्या कृषी निर्यातीत 8.8 टक्क्यांनी घट होऊन ती 43.7 अब्ज डॉलरवर आली आहे.
- कारणे काय ?
- केंद्र सरकारने बिगरबासमती तांदूळ, गहू आणि गव्हाचे उपपदार्थ, साखर, कांदा आदी कृषी उत्पादनावर निर्यातबंदी लावली
- इस्रायल-पॅलेस्टाइन युद्ध
- युद्धाने वेळ आणि वाहतूक खर्चही वाढला
- रशिया-युक्रेन युद्धामुळेही निर्यात विस्कळीत झाली होती.
- निर्यात वाढ कशात?
- अपेडाकडून निर्यात होणाऱ्या २४ प्रमुख कृषी आणि कृषी आधारित उत्पादनांच्या निर्यातीत वाढ दिसून आली.
- प्रामुख्याने फळे, म्हशीचे मांस, प्रक्रियायुक्त भाजीपाला, बासमती तांदूळ आणि केळींचा समावेश आहे.
- उद्दिष्ट?
- जागतिक कृषी निर्यातीत भारताचा वाटा जेमतेम २.५ टक्के आहे, तो चार ते पाच टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
4) आलोक शुक्ला यांना त्यांच्या हसदेव अरण्य चळवळीसाठी 2024 चा आशिया विभागातून गोल्डमन पुरस्कार मिळाला आहे
- छत्तीसगडचे पर्यावरण कार्यकर्ते आणि छत्तीसगड बचाव आंदोलनाचे संयोजक आलोक शुक्ला यांची 2024 च्या गोल्डमन पर्यावरण पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
- गोल्डमन पर्यावरण पुरस्कार, ज्याला ग्रीन नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखले जाते, दरवर्षी जगभरातील तळागाळातील पर्यावरण चॅम्पियन्सना दिले जाते.
- छत्तीसगडमधील हसदेव अरण्य वनक्षेत्र हे छत्तीसगडचे फुफ्फुस मानले जाते. हा परिसर कोळशाने समृद्ध आहे आणि 2010 मध्ये सरकारने खाणकामासाठी खाजगी कंपन्यांना दोन कोळसा खाणींचा लिलाव केला. वनक्षेत्र आणि त्याची परिसंस्था वाचवण्यासाठी आलोक शुक्ला यांनी हसदेव अरण्य बचाव संघर्ष समितीची स्थापना केली होती
- आतापर्यंत सात भारतीयांना गोल्डमन पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
- पहिल्या भारतीय पुरस्कर्त्या = मेधा पाटकर (1992)
- गोल्डमन पर्यावरण पुरस्कार अमेरिकन जोडपे रिचर्ड आणि रोडा गोल्डमन यांनी 1989 मध्ये स्थापन केला होता.
5) इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारताला जून 2024 मध्ये G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे
- 2024 चे G7 चे अध्यक्षपद इटलीकडे आहे
- G7 मध्ये भारताला सहभागी होण्याचे निमंत्रण मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी होते. त्यावेळी फ्रान्स G7 चे यजमान होते.
- मनमोहन सिंग यांनी सर्वाधिक 5 वेळा G7 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले
- G7 = ग्रूप ऑफ सेव्हन
- हा सात सर्वाधिक औद्योगिक लोकशाही देशांचा अनौपचारिक गट आहे ज्याचे स्वतःचे कोणतेही स्थायी सचिवालय नाही.
- 1973 मध्ये अरब देशांनी कच्च्या पेट्रोलियम तेलात अचानक वाढ केल्यामुळे आलेल्या संकटावर चर्चा करण्यासाठी फ्रान्सच्या पुढाकाराने G7 ची स्थापना करण्यात आली.
- सदस्य = फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, इटली, कॅनडा.
(काही काळ रशिया चा देखील यात समावेश होता. मात्र 2014 मध्ये क्रिमिया हल्ल्यानंतर रशिया ची हकालपट्टी करण्यात आली)
6) बांबी बकेट
- बांबी बकेट हे एक विशेष हवाई अग्निशमन साधन आहे जे नुकत्याच लागलेल्या नैनितालच्या जंगलातील आगीशी लढण्यासाठी आयएएफ हेलिकॉप्टर द्वारे वापरत आहे.
- याला हेलिकॉप्टर बकेट किंवा हेलीबकेट असेही म्हणतात. याचा वापर 1980 पासून होत आहे.
7) कलम 31C : खाजगी मालमत्ता हा मूलभूत अधिकार अजूनही आहे की नाही याबाबत सर्वोच न्यायालयात चर्चा सुरू
- सर्वोच्च न्यायालयात सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास कायदा, 1976 (म्हाडा) च्या प्रकरण VIII-A ला आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात या कलमाची घटनात्मक बाब तपासली जात आहे
- कलम 31C = कलम 39(b) आणि कलम 39(c) मध्ये नमूद असणाऱ्या सामाजिक मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही कायदा कलम 14 आणि कलम 19 मधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून रद्द होणार नाही
- कलम 39(b) = समाजाच्या भौतिक संसाधनांचे न्याय्य वितरण
- कलम 39(c) = संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध
- 1969 मधील बँक राष्ट्रीयीकरण प्रकरण (रुस्तम कावासजी कूपर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, 1970) नंतर सरकारने कलम 31C समाविष्ट केले होते
- कलम 31C हे 25 वी घटनादुरुस्ती ने समाविष्ट केलेले होते. परंतु 1973 च्या केशवानंद भरती केस ने यातील काही भाग वगळला होता. त्यानंतर 1980 साली मिनार्वा मिल्स केस ने देखील या कलमाची व्याप्ती कमी केली होती
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel