Current Affairs | चालू घडामोडी | 28 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 28 APR 2024

1) पुण्यात होमरूल ची स्थापना = 28 एप्रिल 1916

 • संस्थापक = लोकमान्य टिळक
 • क्षेत्र = महाराष्ट्र (मुंबई वगळून), कर्नाटक, मध्य प्रांत, बेरार
 • शाखा = सहा

2) उसेन बोल्टनंतर आता युवराज सिंग बनला टी20 विश्वचषकाचा ॲम्बेसेडर

 • 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगनं एका षटकात 6 षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला होता
 • दिनांक : 1 ते 29 जून 2024
 • स्पर्धा ठिकाण : वेस्ट इंडिज आणि अमेरिका

3) तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका

 • स्पर्धा ठिकाण : शांघाय, चीन
 • पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके
 • ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर या भारतीय महिला कंपाउंड संघाने इटलीचा 236-225 असा पराभव केला
 • पुरुष संघात अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश एफ यांनी नेदरलँड्सचा 238-231 असा पराभव केला
 • ज्योती वेन्नम हिने या स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली
 1. वैयक्तिक सुवर्ण
 2. महिला सांघिक सुवर्ण
 3. मिश्र सांघिक सुवर्ण
 • प्रियांशने पुरुष वैयक्तिक रौप्यपदक जिंकले
 • भारतीय संघाने प्रथमच विश्वचषक स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले आहे

4) विश्वचषकात सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक करणारी आंध्र प्रदेशची ज्योती वेन्नम ही तिसरी महिला तिरंदाज ठरली आहे

 • तिने अव्वल मानांकित मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा विरुद्ध शूट-ऑफमध्ये विजय मिळवला
 • असे करणारी ती दीपिका कुमारी नंतरची दुसरीच भारतीय ठरली आहे
 • जागतिक चॅम्पियन 17 वर्षीय आदिती स्वामी आणि 19 वर्षीय परनीत कौर यांच्यासोबत महिला सांघिक सुवर्ण जिंकले
 • अभिषेक वर्मासोबत मिश्र सांघिक सुवर्णपदक देखील जिंकले
 • स्पर्धा ठिकाण= शांघाय, चीन

5) शांघाय येथील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत रिकर्व्ह पुरुष सांघिक प्रकारात भारताने सुवर्णपदक जिंकले.

 • धीरज, तरुणदीप आणि प्रवीण जाधव या त्रिकुटाने अंतिम सामन्यात बलाढ्य दक्षिण कोरियाला ५-१ असे हरवले
 • या सुवर्ण यशाचा फायदा ऑलिम्पिक पात्रतेसाठी मानांकन सुधारण्यासाठी होईल

6) उत्तराखंडमध्ये नैनीताल मधील जंगलाला भीषण आग

 • नैनितालच्या जंगलांना लागलेली आग विझवण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर भीमतल तलावाचे पाणी वापरत आहेत.
 • अग्निशमन कार्यात मदत करण्यासाठी ‘एमआय-१७ व्ही ५’ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत

7) पेंच व्याघ्रप्रकल्पात फुलपाखरांच्या १२४ प्रजाती

 • महाराष्ट्रातील नागपूर मधील पेंच व्याघ्रप्रकल्प आता वाघांसाठीच नाही तर फुलपाखरांसाठीदेखील ओळखला जाणार आहे.
 • तब्बल १४ वर्षांच्या अभ्यासानंतर ताजा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, पेंच व्याघ्रप्रकल्पात १२४ प्रजातींची फुलपाखरे आहेत. या अभ्यासाचे परिणाम पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्राधान्य, फुलपाखरांचे अधिवास म्हणून महत्त्व अधोरेखित करतात.
 • वृक्षारोपणाचे विचारपूर्वक नियोजन केल्यास, पेंच व्याघ्र प्रकल्पातील फुलपाखरांची विविधता वाढू शकते यामुळे फुलपाखरांचे संवर्धन आणि संशोधनासाठी समृद्ध वातावरण निर्माण होऊ शकते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment