current Affairs | चालू घडामोडी | 27 APR 2024

current Affairs | चालू घडामोडी | 27 APR 2024

1) भारतातील पहिले टेलिग्राम = 27 एप्रिल 1854

  • कार्यान्वित ठिकाण = बॉम्बे ते पुणे
  • गव्हर्नर = लॉर्ड डलहौसी

2) बार्सिलोना, स्पेन येथे पहिली महासागर दशक परिषद 2024 पार पडली

  • पहिली महासागर दशक परिषद एप्रिल 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आली होती.
  • युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या सहकार्याने स्पेन सरकारने याचे आयोजन केले होते.
  • 2024 परिषदेची थीम: Delivering the science needed to create the oceans we want

3) मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी फेटाळली

  • न्यायालयाकडून ‘ईव्हीएम’विरोधातील याचिका रद्द; सर्व ‘व्हीव्हीपॅट’ पावत्या मोजण्याची मागणी अमान्य
  • सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
    • व्हीव्हीपॅट मशीनमध्ये निवडणूक चिन्हे अपलोड करणारे युनिट सील करून 45 दिवस सुरक्षित ठेवले जाईल. या आदेशाची पुढील टप्प्यातील मतदानापासून, (१ मे) अंमलबजावणी केली जाईल.
    • निकालानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराने आक्षेप घेतल्यास मतदानयंत्र उत्पादक कंपन्यांमधील तज्ज्ञांकडून मतदानयंत्र व व्हीव्हीपॅट मशीनमधील कार्यप्रणालीमध्ये फेरफार झाला की नाही याची शहानिशा केली जाईल.
    • आक्षेप 7 दिवसात घ्यावा लागेल

4) कुनोतील चित्त्यांसाठी आता नवा अधिवास : गांधीसागर अभयारण्य

  • मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानापासून अवघ्या सहा तासांच्या अंतरावर असलेल्या गांधीसागर अभयारण्यात ६४ किलोमीटरचा परिसर चित्त्यांचा अधिवास म्हणून विकसित करण्यात येत आहे.
  • सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबिया येथून आठ चित्त्यांची पहिली तुकडी भारतात आणण्यात आली.
    • त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्त्यांची दुसरी तुकडी भारतात आली.
    • आतापर्यंत १२ बछड्यांना जन्म दिला आहे
    • सध्या कुनोतील एकूण चित्त्यांची संख्या आता २६ झाली आहे. त्यामुळे कुनोचे क्षेत्र या चित्त्यांसाठी कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन गांधीसागर अभयारण्यात चित्त्यांसाठी नवा अधिवास तयार करण्यात येत आहे.

5) थॉमस, उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धा आजपासून (27 एप्रिल)

  • चेंगडू (चीन) येथे स्पर्धा आयोजित
  • थॉमस कप = पुरुष संघ, उबर कप = महिला संघ
  • 2022 चे थॉमस जेतेपद = भारत

6) IIT गुवाहाटी ने केले 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिटचे अनावरण


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment