Current Affairs | चालू घडामोडी | 29 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 29 DEC 2023

1) कतारमधील अपिलीय न्यायालयाने हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ माजी भारतीय नौसैनिकांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

2) नाशिकमध्ये 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव

  • १२ जानेवारीपासून पाच दिवस २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
  • राज्य शासनाचे क्रीडा व युवकसेवा संचालनालय, केंद्र शासनाचे नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना आणि नाशिक जिल्हा प्रशासन यांच्यावतीने राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी या कालावधीत शहरात होणार आहे.

3) विदेशी गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र पुन्हा सर्वप्रथम

  • विदेशी आर्थिक गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा सर्वप्रथम आला असून गेल्या एप्रिल ते सप्टेंबर २३ या सहा महिन्यांमध्ये ६५ हजार ५०२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
  • ही गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांमधील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे.
  • क्रम
    1) महाराष्ट्र
    2) कर्नाटक
    3) दिल्ली
    4) गुजरात

4) कृष्णविवर मोहीम.

  • 1 जानेवारी 2024 रोजी इस्रो देशाच्या पहिल्या कृष्णविवर आणि न्युट्रॉन तारा वेधशाळेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
  • PSLV-C58 प्रक्षेपकाद्वारे ‘X Ray Polarimeter satellite’ (XPoSat) अवकाशात झेपावणार आहे.
  • वैश्विक क्ष-किरणांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करण्यासाठीची ही नियोजित अवकाश वेधशाळा आहे.

5) भारत GPT

  • रिलायन्स आणि आयआयटी संयुक्तरीत्या विकसित करणार.

6) 100 वे नाट्य संमेलनाला तंजावर, सांगली येथे सुरुवात.

  • 100 व्या संमेलनाचे अध्यक्ष = डॉ. जब्बार पटेल
  • 99 व्या संमेलनाचे अध्यक्ष = प्रेमानंद गज्वी

7) भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहणार ॲडहॉक कमिटी, भूपिंदर सिंग बाजवा यांच्या कडे सोपवली जबाबदारी.

8) अयोध्या विमानतळ आता ‘महर्षी वाल्मिकी’ नावाने ओळखले जाणार.

  • श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील विमानतळाचे नवे नाव निश्चित झाले आहे.
  • आता अयोध्या विमानतळ ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ नावाने ओळखले जाईल.
  • विशेष म्हणजे, बुधवारी अयोध्या रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात आले.
  • अयोध्या रेल्वे स्थानक आता ‘अयोध्या जंक्शन धाम’ म्हणून ओळखले जाणार आहे.
  • पूर्वी या विमानतळाचे नाव मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment