Current Affairs | चालू घडामोडी | 30 SEPT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 30 SEPT 2023

CURRENT AFFAIRS

1) ‘भारताच्या हरितक्रांतीचे जनक’ M. S. स्वामीनाथन यांचे निधन.

  • भारतात हरितक्रांती घडवून आणणारे महान शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचे वयाच्या 98 व्या वर्षी ’28 सप्टेंबर 2023′ रोजी निधन झाले.
  • त्यांची कारकीर्द फार मोठी असून यशाने अधोरेखित केलेली आहे.
  • कारकीर्द = जन्म 7 ऑगस्ट 1925 तामीळनाडूतील कुंभकोणम येथे.

1.1) 1961 ते 1972 या 11 वर्षाच्या काळात ‘भारतीय कृषी संशोधन संस्थेचे’ संचालक.

1.2) 1972 ते 1979 या काळात ते ‘ICAR’ इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चर रिसर्च चे महासंचालक आणि केंद्रीय कृषी विभागाचे सचिव म्हणून काम . त्यानंतर कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती.

1.3) 1980 ते 1982 नियोजन आयोगाचे उपसंचालक.

1.4) 1982 ते 1988 ‘इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट’ चे महासंचालक (IRRI) .

1.5) 2004 मध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थापन ‘राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या’ अध्यक्षपदी नियुक्ती. तो स्वामीनाथन आयोग म्हणून प्रसिद्ध.

1.6) स्वामीनाथन आयोगाकडून 2006 मध्ये सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर.

1.7) शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मिळणारा हमीभाव हा मालाच्या उत्पादनाच्या खर्चाच्या किमान दुप्पट असावा अशी अहवालात शिफारस.

  • पुरस्कार
    • 1967 – पद्मश्री
    • 1971 – रॅमन मॅगसेसे
    • 1972 – पद्मभूषण
    • 1987 – ‘वर्ल्ड फूड प्राइज’ ( जागतिक अन्न पुरस्कार )
    • 1989 – पद्मविभूषण
    • 2007-13 – राज्यसभा सदस्य

2) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023

  • महिला 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य दोन्ही भारताकडे.
    • 17 वर्षीय पलक गुलिया – सुवर्ण
    • 18 वर्षीय ईशा सिंग – रौप्य
    • एकाच क्रीडा प्रकारात सुवर्ण व रौप्य मिळवण्याची ही एशियन गेम्स मधील भारताची पहिलीच वेळ.
  • पुरुषांच्या 50 मीटर 3 पी सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक.
    • स्वप्नील, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर आणी अखिल शेओरान यांनी ही कामगिरी केली.
  • स्कॅश पुरुष संघाला सुवर्णपदक
    • सौरव घोषाल, महेश मानगावकर, अभय सिंग या संघाचे हे जेतेपद.
  • टेनिस मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक.
    • रोहन बोपन्ना आणी ऋतुजा भोसले या जोडीची ही सुवर्ण कामगिरी.
    • ऋतूजा भोसले ही महाराष्ट्रातील सोलापूरची आहे.

3) मेरा स्टेशन मेरा अभिमान 2023

  • मोठ्या रेल्वे स्टेशन गटांमध्ये महाराष्ट्रात सर्वात स्वच्छ व सुंदर रेल्वे स्टेशनचा पुरस्कार ‘सांगली स्थानकाला’ मिळाला (यापूर्वी चार वेळा सांगलीला पुरस्कार).
  • छोट्या स्थानकात सातारा जिल्ह्यातील वाठार स्थानकाची बाजी.

4) किल्लारी भूकंपाला 30 वर्षे पूर्ण.

  • 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी (तालुका औसा , जिल्हा लातूर) येथे पहाटेच्या वेळेस 6.4 स्केलचा भूकंप. याला तीव्र म्हणून वर्गीकृत.

5) महिला आरक्षणाला कायद्याचे स्वरूप राष्ट्रपतींची विधेयकाला संमती.

  • नारीशक्ती अधिनियम विधेयक

5.1) 20 सप्टेंबर 2023 – लोकसभेत मंजूर.

5.2) 21 सप्टेंबर 2023 – राज्यसभेत मंजूर.

5.3) 29 सप्टेंबर 2023 – राष्ट्रपतींकडून मंजुरी.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment