Current Affairs | चालू घडामोडी | 24 FEB 2024
1) 24 फेब्रुवारी
1.1) जागतिक मुद्रण दिन
- मुद्रण कलेचा जनक गुटेनबर्ग चा जन्म
- भारतातील पहिला छापखाना अलिबाग येथे सुरू झाला (1870)
1.2) देशातील पहिला नगरपालिका बॉण्ड इंडेक्स बेंगलोर जाहीर = 24 फेब्रुवारी 2023
- NSE द्वारे पहिला म्युनिसिपल बॉण्ड अहमदाबाद मनपा
- पहिले म्युनिसिपल ग्रीन बॉण्ड इंदोर मनपा
2) ‘पेटीएम’ अॅप कार्यान्वित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे ‘एनपीसीआय’ला मदतीचे आर्जव
- देयक व्यवहार सुरुळीतपणे कार्यान्वित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने यूपीआय प्रणालीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयला मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
- मध्यवर्ती बँकेने पेटीएमचे आर्थिक व्यवहाराची प्रक्रिया करणाऱ्या पेटीएम पेमेंट्स बँकेला १५ मार्च २०२४ नंतर वॉलेट आणि तत्सम सेवांच्या व्यवहारास प्रतिबंध करणारा आदेश अलीकडेच दिला आहे.
3) अपंग, वृद्धांना आता घरातून मतदानाची संधी
- आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे.
- पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वयोगट आणि शारीरिक विकलांग मतदारांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली होती.
4) अमेरिकेच्या पहिल्या व्यावसायिक अवकाशयानाचे चंद्रावतरण!
- खाजगी कंपनीने अवकाशयान चंद्रावर उतरण्याची पहिलीच वेळ
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा अमेरिका भारतानंतरचा दुसरा देश.
- गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळानंतर अमेरिकेने चंद्रावर प्रथमच खासगी मोहिमेतील बग्गी चालवून अमेरिकेसह भारत, रशिया आणि चीनबरोबर स्थान मिळवले.
- ‘इंट्युटिव्ह मशिन्स’ या कंपनीने तयार केलेले ‘ओडिसिस’ नावाचे हे अवकाशयान (बग्गी) आहे.
- १९७२ मध्ये झालेल्या ‘अपोलो १७’ मोहिमेनंतर प्रथमच अमेरिकेच्या अवकाशयानाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे.
5) महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाने रचला इतिहास देशातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ म्हणून घोषित केला.
- नुकतेच इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन या संस्थेतर्फे
‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ ‘देशातील पहिले डार्क स्काय पार्क’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर हे आशियातील पाचवे डार्क स्काय पार्क’ (Dark Sky Park) ठरले आहे.
- ‘डार्क स्काय पार्क’ म्हणजे काय?
- डार्क स्काय पार्क म्हणजे जिथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल आणि त्या ठिकाणची हवा प्रदूषणमुक्त असेल. त्यामुळे आकाश सहज न्याहाळता येईल.
- असा परिसर आकाश निरिक्षणसाठी उत्तम म्हणून जाहीर केला जातो आणि त्याच भागाला ‘डार्क स्काय पार्क’ असे म्हटले जाते.
- महाराष्ट्रमध्ये सध्या सहा व्याघ्र प्रकल्प आहेत –
- मेळघाट (अमरावती)
- ताडोबा ( चंद्रपूर)
- पेंच (नागपूर)
- सह्याद्री ( कोल्हापूर)
- नवेगाव नागझिरा (गोंदिया)
- बोर (वर्धा)
6) महाराष्ट्रात 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणार
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
- ‘नमो दिव्यांग शक्ती’ अभियानांतर्गत राज्यात 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे.
- यात दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्धता राहील
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel