Current Affairs | चालू घडामोडी | 25 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 25 FEB 2024

1) महाराष्ट्र राज्याचे कृषी निर्यात धोरण जाहीर = 25 फेब्रुवारी 2022

 • राज्याचे स्वतंत्र कृषी निर्यात धोरण असणारे पहिले राज्य
 • देशाचे कृषी निर्यात धोरण 2018

2) जगातील 300 सहकारी संस्थांमध्ये इफ्को पहिल्या क्रमांकावर

 • एकूण उलाढालीत 72 व्या क्रमांकावर
 • इफ्को गेल्या आर्थिक वर्षात 97 व्या स्थानावरून एकूण उलाढालीच्या क्रमवारीत 72 व्या स्थानावर पाऊल टाकले आहे

3) नवीन फौजदारी कायदे १ जुलै 2024 पासून लागू होणार

 • देशातील फौजदारी न्याय प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी ‘भारतीय न्याय संहिता’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ आणि ‘भारतीय साक्ष कायदा’ हे तीन नवीन फौजदारी कायदे करण्यात आले आहेत
 • या तिन्ही कायद्यांना संसदेने गेल्या वर्षी २१ डिसेंबरला मंजुरी दिली होती आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ डिसेंबरला त्यावर स्वाक्षरी केली होती.
 • ‘हिट अँड रन’शी संबंधित तरतुदींविरोधात ट्रकचालकांनी देशभरात केलेल्या निदर्शनांनंतर त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार, त्या लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • भारतीय न्याय संहितेच्या नुसार, वाहनचालकाच्या भरधाव आणि निष्काळजी वाहन चालवण्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास १० वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आहे.
 • दहशतवादाची स्पष्ट व्याख्या, राजद्रोहाचा गुन्हा वगळणे आणि ‘शासनाविरोधातील गुन्ह्यां’चे नवीन कलम ही याची वैशिष्ट्ये आहेत.
 • अलगाववाद, सशस्त्र बंडखोरी, विध्वंसक कृत्ये, फुटीरवादी कृत्ये किंवा सार्वभौमत्व किंवा एकता धोक्यात आणणारी कृत्ये यांचाही समावेश आहे.

4) आसाम सरकारने राज्यातील ‘मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, १९३५’ रद्द केला.

 • हे ‘समान नागरी कायद्या’च्या दिशेने आसामचे पाऊल आहे असे समजण्यात येत आहे.

5) जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना सुरू

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रामध्ये जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेला सुरुवात केली.
 • या योजनेसाठी १.२५ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
 • एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत ११ राज्यांमधील प्राथमिक कृषी पत सोसायट्यांच्या ११ गोदामांचे उद्घाटन केले.
 • या योजनेअंतर्गत आगामी पाच वर्षांमध्ये सहकार क्षेत्रात ७०० लाख टन धान्य सावणूक क्षमता उभारली जाईल, त्यासाठी हजारो गोदामे आणि वेअरहाऊस उभारले जातील असे मोदींनी यावेळी सांगितले.
 • देशात पुरेशा पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत होते असे ते म्हणाले.

6) कर्नाटकात मंदिरांबाबत विधेयक नामंजूर

 • सिद्धरामय्या सरकारने मांडलेले मंदिरांबाबतचे विधेयक कर्नाटक विधान परिषदेत आवाजी मतदानाने फेटाळण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारला धक्का बसला आहे.
 • या विधेयकात ज्या मंदिरांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख ते एक कोटी आहे, त्यांच्याकडून पाच टक्के रक्कम तर एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून दहा टक्के रक्कम घेण्याची तरतूद होती.

7) वर्षभरात ४५ नव्या राजकीय पक्षांची नोंद : निवडणूक आयोगाकडून माहिती

 • डिसेंबर २०२२ मध्ये राज्यात ३५१ राजकीय पक्ष होते. डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांची संख्या ३७६ इतकी झाली. आता ती संख्या ३९६ वर पोचली आहे.
 • राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियमन करतो.
 • कपिल पाटील यांचा नवा पक्ष
  • जनता दलाचे (संयुक्त )विधान परिषदेचे शिक्षक गटातील आमदार कपिल पाटील हे ३ मार्च रोजी नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.
  • पाटील जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपबरोबर आघाडी केल्याने पाटील यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ते ‘समाजवादी जनता दल’ नावाने नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत.

8) संरक्षण उत्पादनात अग्रेसर राहण्यासाठी राज्यात चार विशेष क्षेत्रांची उभारणी

 • पुणे, नागपूर, शिर्डी आणि रत्नागिरी अशा चार विशेष क्षेत्रांची (डिफेन्स क्लस्टर) उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
 • लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्याोगांच्या (एमएसएमई) योगदानाने संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी याची उभारणी केली जाईल
 • सन २०१७ मध्ये एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. हे धोरण आता नव्याने अद्यायावत केले जाणार आहे.
 • मोशी येथे भरविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ प्रदर्शनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

9) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेवग्याचा आधार

 • कमी पाण्यात उत्पादन, बहुगुणी उपयोग, परदेशातील मागणीमुळे शेवग्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे.
 • शेवग्याच्या शेतीतून या शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू लागले असून काही शेतकरी एकरी किमान तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेऊ लागले आहेत
 • व्यावसायिक महत्त्व
 • शेवग्याच्या शेंगांच्या प्रक्रियायुक्त भुकटीचीही निर्यात होते. या भुकटीचा उपयोग मोठ्या हॉटेलांमध्ये सूपमध्ये करण्यात येतो.
  • शेंगा उकडून त्याच्या गराचा उपयोग प्रतिजैवकांमध्ये होतो. शेवग्याच्या वाळलेल्या पानांचा उपयोग ‘ग्रीन टी’मध्ये केला जात असल्याने त्यालाही मागणी आहे.
  • पानांच्या भुकटीपासून गोळ्या तयार केल्या जातात. त्यांचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी होतो. शेवग्याच्या फुलांची भाजी व्यतिरिक्त वाळलेल्या फुलांच्या भुकटीचा उपयोग हाडे बळकट करणाऱ्या औषधांमध्ये करण्यात येतो.

10) स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाच नवीन एम्सचे एकाच दिवशी राष्ट्रार्पण

 • पाच नवीन एम्स गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये स्थापनार
 • पाच एम्स
 1. एम्स राजकोट
 2. एम्स भटिंडा
 3. एम्स रायबरेली
 4. एम्स कल्याणी
 5. एम्स मंगलगिरी

11) जागतिक व्यापार संघटनेची 2024 ची मंत्रीपरिषद अबुधाबी मध्ये

 • 164 देशांचे प्रतिनिधी अबुधाबी मध्ये दाखल
 • युरोपियन युनियन ने संयुक्त राष्ट्राच्या शून्य कार्बन धोरणाला अनुसरून इतर देशांच्या कार्बन निर्मिती करणाऱ्या पदार्थांवर कार्बन कर लावण्याचे जाहीर केले आहे
 • युरोपच्या कार्बन कर धोरणामुळे भारताच्या लघु आणि मध्यम उद्योगाला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली असून प्रामुख्याने औषधी व वाहन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment