Current Affairs | चालू घडामोडी | 23 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 23 FEB 2024

1) आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेची (ISO) स्थापना = 23 फेब्रुवारी 1947

  • मुख्यालय = जिनिव्हा

2) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

  • जन्म
    • जन्म -: 2 डिसेंबर 1937 ( रायगड) (मूळ गाव = बीड)-
    • मृत्यू : 23 फेब्रुवारी 2024
  • कारकीर्द
    • महाराष्ट्राचे 12 वे मुख्यमंत्री -1995 -1999
    • लोकसभेचे 13 वे सभापती 2002 –  2004
    • अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री 1999 -2002
    • 1995 मध्ये शिवसेना- भारतीय जनता पक्ष (भाजप) युती सत्तेवर आल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले बिगर – काँग्रेस मुख्यमंत्री
    • शिवसेनेचे पाहिले मुख्यमंत्री
  • महत्वाची पदे
    • नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका
    • मुंबई महापौर
    • महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य
    • महाराष्ट्र विधानसभा सदस्य
    • लोकसभा सदस्य
    • लोकसभा अध्यक्ष
    • राज्यसभा सदस्य
    • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

3) 57 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा

  • महाराष्ट्र भूषण 2023 = अशोक सराफ
  • गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2022 = सुरेश वाडकर
  • राजकपूर विशेष योगदान पुरस्कार
    • 2020- जे. पी. दत्ता, ज्येष्ठ दिग्दर्शक
    • 2021 – सोनू निगम, गायक
    • 2022 – विधू विनोद चोप्रा, दिग्दर्शक
  • राजकपूर जीवनगौरव पुरस्कार
    • 2020- अरुणा इराणी, ज्येष्ठ अभिनेत्री
    • 2021- मिथुन चक्रवर्ती, ज्येष्ठ अभिनेते
    • 2022- हेलन, ज्येष्ठ अभिनेत्री
  • चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार
    • 2020- स्व. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), अभिनेते
    • 2021- उषा चव्हाण, ज्येष्ठ अभिनेत्री
    • 2022- उषा नाईक, ज्येष्ठ अभिनेत्री
  • चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार
    • 2020- गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक
    • 2021- रवींद्र साठे, ज्येष्ठ पार्श्वगायक
    • 2022- नागराज मंजुळे, अभिनेते-दिग्दर्शक
  • विजेत्यांची यादी
    • दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक-1 – अजित वाडीकर- चित्रपट- वाय
    • सर्वोत्कृष्ट अभिनेता- दीपक डोबरियाल (बाबा)
    • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर)

4) राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह बहाल केले आहे.

5) एबेल 521 दीर्घिका समूहाचा जीएमआरटी करून वेध

  • पृथ्वीपासून २०० कोटी प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ‘एबेल ५२१’ दीर्घिका समूहाचा वेध घेण्यात यश मिळवले आहे.
  • या दीर्घिका समूहाची आतापर्यंतची सर्वांत तपशीलवार प्रतिमा तयार करण्यासाठी खोडद,नारायणगाव जवळील अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (जीएमआरटी) वापर केला आहे.

6) उपग्रहांसाठी घटक तयार करण्यासाठी १०० टक्के परदेशातील गुंतवणुकीला (FDI) परवानगी

  • परदेशी कंपन्या आणि खासगी कंपन्यांना या क्षेत्रात आकर्षित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने FDI चे नियम सुलभ केले आणि उपग्रहांसाठी घटक तयार करण्यासाठी १०० टक्के परदेशातील गुंतवणुकीला परवानगी दिली, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
  • फायदे
  1. खासगी क्षेत्राचा हा वाढीव सहभाग रोजगार निर्मितीला मदत करेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य करेल आणि या क्षेत्राला स्वावलंबी करेल.
  2. या निर्णयामुळे भारतीय कंपन्यांना जागतिक मूल्य साखळीत सामावून घेतले जाईल अशी अपेक्षा आहे.
  3. यामुळे, कंपन्यांना देशातच त्यांच्या उत्पादन सुविधा उभारून सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना योग्य पद्धतीने प्रोत्साहन देता येईल.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment