Current Affairs | चालू घडामोडी | 02 APR 2024
1) पुणे सार्वजनिक सभेची स्थापना = 2 एप्रिल 1870
- कार्य = महाराष्ट्रात दुष्काळ फंड उभा केला (1876 ते 1877)
- नेते = म.गो. रानडे, सार्वजनिक काका, सिताराम चिपळूणकर, सदाशिव गावंडे, शिवराम साठे
2) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा
- घोषवाक्य =
स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती.
- स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
- MPSC मुख्यालय = बेलापूर नवी मुंबई
3) नोबेल पारितोषिक विजेते डॅनियल काहनेमन यांचे निधन
- काहनेमन यांचा जन्म 5 मार्च 1934 रोजी तेल अवीव येथे झाला.
- डॅनियल काहनेमन हे प्रसिद्ध इस्रायली-अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते होते.
- काहनेमन यांच्या संशोधनामुळे त्यांना 2002 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
4) पहिला “जागतिक असमानता संशोधन पुरस्कार”
- बीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस यांना पहिला “जागतिक असमानता संशोधन पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
- सामाजिक आणि पर्यावरणीय असमानता समजून घेण्यासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी पहिला “जागतिक असमानता संशोधन पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.
5) आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस = 30 मार्च
- पहिल्यांदा साजरा = 2023
6) कचाथीवू बेट नेमके कुठे?
- भारत आणि श्रीलंका दरम्यान पाल्कच्या सामुद्रधुनीत कचाथीवू हे २८२ एकरचे निर्मनुष्य बेट आहे.
- या बेटावर सेंट अँथनीज हे कॅथलिक चर्च आहे. तेथे वार्षिक यात्रेसाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांतून धर्मगुरू आणि यात्रेकरू येतात. बेटावर पाण्याचा उद्भव नसल्यामुळे कचाथीवू वस्तीयोग्य नाही.
7) ‘संरक्षण निर्यातीत अभूतपूर्व वाढ’
- देशाच्या संरक्षण निर्यातीने अभूतपूर्व उंची गाठली आहे आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच २१,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
- भारताची संरक्षण निर्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात २१,०८३ कोटी रुपयांपर्यंत आहे, ती मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३२.५ टक्क्यांनी वाढली आहे.
8) महाराष्ट्रातील नऊ वस्तूंना जीआय (भौगोलिक) मानांकन (GI)
- बदलापूर जांभळे
- बहाडोलीची जांभळे
- पेणच्या गणेशमूर्ती,
- लातूर जिल्ह्यातील कास्ती या गावाची कोथिंबीर,
- लातूर मधील निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील चिंच
- लातूर मधील बोरसुरी येथील तुरडाळ समावेश
- जालनाची दगडी ज्वारी,
- धाराशीव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा खवा
- तुळजापूरच्या कवडी
9) निवडणुकीचा इतिहास 14
- काँग्रेस पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने दहा वर्षाचा कालावधी पूर्ण केला होता
- 2014 च्या निवडणुकीत भाजपने “अबकी बार, मोदी सरकार” व “अच्छे दिन आयेंगे” हे दोन नारे निवडणूक प्रचारात दिले
- 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचे नवनेतृत्व स्वीकारले गेले
- भाजपने तब्बल 282 जागा तर त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला एकत्र 336 जागा मिळाल्या.
- याच निवडणुकीत काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या
- भाजपला सात राज्यांत शंभर टक्के जागा मिळाल्या तर उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 व पंजाब मध्ये दहापैकी नऊ एवढ्या जागा मिळाल्या.
10) महाराष्ट्राचा बालमृत्यू दर व नवजात मृत्युदर घटला
- केंद्र शासनाच्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षण व अहवालानुसार आकडेवारी समोर.
- बालमृत्यू दर (प्रति एक हजार)
- 2018 = 22
- 2024 = 18
- नवजात मृत्यू दर (प्रति एक हजार)
- 2018 = 13
- 2024 = 11
- संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयानुसार (SDG) सन 2030 पर्यंत नवजात मृत्यू दर 12 पेक्षा कमी करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आलेले होते. महाराष्ट्राने हे उद्दिष्ट 2020 मध्येच पूर्ण केलेले आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel