Current Affairs | चालू घडामोडी | 07 FEB 2026

Current Affairs | चालू घडामोडी | 07 FEB 2026

1) ७ फेब्रुवारी दिनविशेष

१.१) शलकी पाणबुडी सेवेत दाखल = ७ फेब्रुवारी १९९२

  • भारतात बांधणी केलेली पहिली पाणबुडी

१.२) १२७४: महानुभाव पंथाचे संस्थापक – श्री चक्रधर स्वामी यांचे निधन

१.३) रमाबाई आंबेडकर (१८९८): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी ‘त्यागमुर्ती’ रमाई यांचा जन्म याच दिवशी झाला

2) इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो २०२६

  • दिनांक –  १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२६
  • ठिकाण – भारत मंडपम, नवी दिल्ली
  • आयोजक- MeitY अंतर्गत IndiaAI Mission.
  • थीम – A global convergence of scale, innovation, and impact
  • प्रदर्शनाचा उद्देश – AI यला लोक, पर्यावरण आणि प्रगतीसाठी वापरणे; भारताला ग्लोबल एआय लीडर बनवणे
  • सहभाग – 400+ (स्टार्टअप्स, कॉर्पोरेट्स, मंत्रालये, 19+ राज्ये, 10+ देश)

3) सध्या देशात चार ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री कार्यरत

● सुनेत्रा पवार (महाराष्ट्र)
● नेमचा किपगेन (मणिपूर)
● दिया कुमारी (राजस्थान)
● प्रवती परिडा (ओडिशा)

4) ३५ वी किशोर व किशोरी सब-ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धा  २०२५-२६

◾️महाराष्ट्राच्या किशोरी संघाने सलग आठव्यांदा विजेतेपद जिंकले

  • अंतिम सामना – महाराष्ट्र vs राजस्थान (२७-१५)
  • ठिकाण – कुरुक्षेत्र हरियाणा
  • कालावधी-  ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२६
  • आयोजक – खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया
  • विशेष – महाराष्ट्राच्या किशोरी संघाची ऐतिहासिक सलग आठवी यशस्वी मालिका
  • मुलांचा (किशोर)विजेता – ओडिशा (महाराष्ट्राचा ३ रा क्रमांक)

5) भारत टॅक्सीचा दिल्लीमध्ये प्रारंभ

  • चालकच मालक, ओला-उबरला आव्हान

● भारत टॅक्सी हा सहकारी मॉडेलवर आधारित प्लॅटफॉर्म आहे
● किमान भाडे – ₹30 (4 किमी पर्यंत) केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या पुढाकारातून सुरू झालेली ‘भारत टॅक्सी’ ही सहकारी तत्त्वावरील टॅक्सी सेवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात सुरू करण्यात आली

  • भारत टॅक्सीची ठळक वैशिष्ट्ये
    • शून्य कमिशन – कंपनीकडून कोणतीही कपात नाही
    • सर्ज प्रायसिंग नाही (पीक अवरमध्ये वाढीव भाडे नाही)
    • पेमेंट थेट चालकाच्या खात्यात
    • सहकारी मॉडेल – ड्रायव्हर हे सदस्य/भागीदार
    • दुचाकी, तीनचाकी व चारचाकी सेवा उपलब्ध
    • महिला रायडर्स व ड्रायव्हर्ससाठी ‘सारथी दीदी’ उपक्रम
  • ओला-उबरपेक्षा भारत टॅक्सी कशी वेगळी?
    • ओला-उबर : 20–30% कमिशन
    • भारत टॅक्सी : कमिशन शून्य
    • नफा थेट चालकांनाच
    • मध्यस्थांची भूमिका संपुष्टात

6) सौ. निवेदिता दुबे – एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) च्या मानव संसाधन संचालक मंडळावर प्रथम महिला संचालक म्हणून नियुक्ती

  • नियुक्ती – 30 जानेवारी 2026
  • नियुक्तीपूर्वी त्या – AAI च्या कोलकाता (पूर्व विभाग) येथे प्रादेशिक कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होत्या
  • 1995 मध्ये AAI मध्ये विमानतळ व्यवस्थापक म्हणून कारकीर्द सुरू केली.
  • 2023 – त्या AAI च्या पूर्व विभागाच्या पहिल्या महिला प्रादेशिक कार्यकारी संचालक बनल्या

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment