Current Affairs | चालू घडामोडी | 01 Mar 2024
1) 1 मार्च
- येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले = 1 मार्च 1872
- ठिकाण = अमेरिका
- शून्य भेदभाव दिवस
- राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग स्थापना (NCPCR) = 1 मार्च 2007
- बालहक्क संरक्षण आयोग कायदा 2005 अंतर्गत वैधानिक संस्था
2) महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारीपदी एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती
- या अगोदरचे श्रीकांत देशपांडे यांची बदली
3) मुंबईखेरीज सर्व महापालिकांमध्ये पुन्हा चार सदस्यीय प्रभाग
- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रभागांची संख्या वाढवण्याकरिता अध्यादेश काढण्यात येणार आहे.
- प्रभाग रचनेचा खेळ
- २००२ : बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू. महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग
- २००७ : पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू
- २०१२ : चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू
- २०१७ : चार सदस्यीय प्रभाग पद्धत कायम
- २०२० : एक सदस्यीय प्रभाग पद्धत
- २०२१ : तीन सदस्यीय प्रभाग पद्धत
- फेब्रुवारी २०२४ : पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धत
4) समूह शाळांसाठी राज्यभरातून ७०० प्रस्ताव
- कमी पटसंख्येच्या शाळांच्या समायोजनातून समूह शाळा (क्लस्टर स्कूल) निर्माण करण्यासाठी राज्यभरातून सुमारे ७०० प्रस्ताव आले आहेत. त्यात साधारण १९०० शाळांचे समायोजन करून या समूह शाळा निर्माण करणे प्रस्तावित आहे.
- शिक्षण विभागाने राज्यातील शून्य ते २० विद्यार्थी पटसंख्येच्या शासकीय शाळांचे समायोजन करून नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ आणि पुणे जिल्ह्यातील पानशेत या समूह शाळांच्या धर्तीवर समूह शाळा निर्मितीचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत मागवले होते.
- कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासात अडचणी येतात. मात्र, समूह शाळांचा फायदा विद्यार्थ्यांना एकूणच शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- परंतु यामुळे तेथील शाळांची संख्या मात्र कमी होऊ शकते
5) देशात बिबट्यांची संख्या १३ हजार ८७४
- २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या तुलनेत त्यात १.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्याच्या सद्यास्थितीबाबतचा अहवाल जाहीर केला.
- वर्ष व बिबटयांची संख्या २०२२
- मध्यप्रदेश = ३९०७
- महाराष्ट्र = १९८५
- कर्नाटक = १८७९
- तामिळनाडू = १०७०
6) 2023 – 24 च्या तिसऱ्या तिमाहीत ‘जीडीपी’ वाढ ८.४ टक्क्यांवर
- परिणामी, आता संपूर्ण वर्षासाठी अर्थव्यवस्थेची वाढ ही ७.६ टक्के अशी अनपेक्षितपणे उच्च राहण्याचे अपेक्षिण्यात आले आहे.
- क्षेत्रवार वाढ कशी?
- निर्मिती क्षेत्र (११.६ टक्के)
- बांधकाम क्षेत्र (९.५ टक्के)
- वित्तीय क्षेत्र, स्थावर मालमत्ता आणि सेवा क्षेत्र (७ टक्के)
- व्यापार, आतिथ्य, वाहतूक (६.७ टक्के)
- शेती क्षेत्रातील वाढ उणे -०.८ टक्के अशी राहिली
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आकडेवारी जारी केली
- वित्तीय तूट उद्दिष्टाच्या ६४ टक्क्यांवर
- एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांत सरकारची वित्तीय तूट ही २०२३-२४ या संपूर्ण वर्षासाठी निर्धारित उद्दिष्टाच्या ६४ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ११.०३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
7) ‘पीएम सूर्य घर’ योजना
- या योजनेअंतर्गत देशातील १ कोटी कुटुंबांना घराच्या छतावर सौरउर्जा युनिट बसवता येईल. त्यातून या कुटुंबांना ३०० युनिट वीज मोफत मिळू शकेल. तसेच, अतिरिक्त विजेची विक्री करून दरमहा उत्पन्नही मिळवता येईल
- ‘पीएम सूर्य घर योजने’ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी रोजी घोषणा केली होती.
- घरावर सौरउर्जा पॅनल उभे करण्यासाठी केंद्र सरकार १ किलोवॉटसाठी ३० हजारांचे अनुदान, २ किलोवॉटसाठी ६० हजार तर ३ किलोवॉटसाठी ७८ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. उर्वरित रक्कम बँकांकडून कमी व्याजदाराने मिळू शकेल. या योजनेसाठी कमाल व्याजदर रेपो रेटपेक्षा ०.५ टक्के अधिक असेल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
- या योजनेतून घरांमध्ये विजेचा पुरवठा होईलच, शिवाय, त्यातून घरगुती वीजनिर्मितीलाही चालना मिळेल.
- एका कुटुंबाने ३ किलोवॉटची प्रणाली उभी केली तर दरमहा सरासरी ३०० पेक्षा जास्त युनिट्सची वीजनिर्मिती करता येऊ शकेल. त्यातील ३०० किलोवॉटपर्यंतची वीज मोफत वापरता येईल. अतिरिक्त वीज नेट मीटरिंगद्वारे डिस्कॉम्सना विकता येतील
8) ‘बिग कॅट अलायन्स’ मंजुरी
- वाघ आणि इतर मोठ्या मार्जार प्रजातींच्या संवर्धनासाठी जागतिक स्तरावर माहितीच्या अदान-प्रदानासाठी आंतरराष्ट्रीय ‘बिग कॅट अलायन्स’ची निर्मिती करण्यात आली असून तिला 29 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- या अलायन्सचे मुख्यालय भारतामध्ये असेल.
- २०२३-२४ ते २०२७-२८ या पाच वर्षांसाठी अलायन्ससाठी १५० कोटींच्या एकरकमी अर्थसंकल्पीय तरतुदीला मंजुरी देण्यात आली.
- सात मोठ्या मांजर प्रजातींमध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिमचित्ता, प्यूमा, जग्वार आणि चित्ता या प्रजातींचा समावेश होतो.
- त्यापैकी वाघ, सिंह, बिबट्या, हिम चित्ता आणि चित्ता या पाच प्रजाती भारतात आढळतात. तर प्युमा आणि जग्वार भारतात आढळत नाहीत
9) थेट परदेशी गुंतवणुकीत (FDI) १३ टक्क्यांनी घसरण
- चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) १३ टक्क्यांनी घसरून ३२.०३ अब्ज डॉलरपर्यंत सीमित राहिली.
- मुख्यत: संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, दूरसंचार, वाहननिर्मिती आणि औषधी निर्माण क्षेत्रातील प्रवाह आटल्याने एकंदर ‘एफडीआय’मध्ये घसरण निदर्शनास आली आहे.
- एकूण ‘एफडीआय’ म्हणजेच ज्यामध्ये भागभांडवली गुंतवणूक, अतिरिक्त अथवा पुनर्गुंतवणूक आणि इतर भांडवलांचा समावेश असतो त्यात सरलेल्या नऊ महिन्यांत ७ टक्क्यांची घसरण झाली आहे.
- महाराष्ट्रात सर्वाधिक ‘एफडीआय’
- देशात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यास महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून, या माध्यमातून सर्वाधिक १२.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक राज्यात आली.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel