Current Affairs | चालू घडामोडी | 02 FEB 2024
1) 2 फेब्रुवारी
- WORLD WETLAND DAY (जागतिक पाणथळ दिवस)
- पाणथळ जागा संबंधीच्या रामसर कराराचा स्वीकार या दिवशी = 2 फेब्रुवारी 1971
- 2024 थीम = ‘वेटलँड्स अँड ह्यूमन वेलबिंग’
- एकूण रामसर स्थळे = 80
(भारतात एकूण 75 रामसर स्थळे होती. 1 फेब्रुवारी 2024 रोजी 5 अजून स्थळांना रामसर दर्जा मिळाल्याने आता एकूण संख्या 80 झाली) - सर्वाधिक = UK (175)
- मेकॉले मिनिट जाहीर = 2 फेब्रुवारी 1835
- इंग्रजी भाषेचा शिक्षण पद्धतीत समवेशास समर्थन
2) शिक्षक भरतीत खोटी पटसंख्या रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘पेन’
- खोट्या पटसंख्येच्या आधारे शिक्षक भरती करून शासन अनुदान मिळवून देण्याचा जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधील प्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ‘कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक’ (पर्मनन्ट एज्युकेशन नंबर-पेन) देण्याचा निर्णय घेतला आहे.
- शिक्षण संस्थांनी शाळेतील विद्यार्थ्याची नोंदणी ‘यू-डायस प्लस’च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी ‘यू-डायस प्लस’वर होईल. त्यांनाच ‘पेन’ क्रमांक मिळणार आहे.
- विद्यार्थी शाळेत नसताना पट वाढविण्यासाठी शाळेने चुकीची नावे घुसवली. अशा प्रकरणी यापुढे कारवाई होणार असल्याने कोणीही शाळा यापुढे विद्यार्थ्यांची बनावट पटसंख्या दाखवून पट वाढविण्याचा प्रयत्न करणार नाही.
3) पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आई’ हे महिला केंद्र धोरण जाहीर करण्यात आले आहे.
4) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय यांनी तमिझगा वेत्री कळघम (TVK) या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला.
5) फ्रान्स ने स्वीकारले UPI
- युरोप मधील पहिला UPI स्वीकारणारा देश
- या उपक्रमाची सुरुवात आयफेल टॉवरपासून झाली आहे, जिथे भारतीय पर्यटक आता त्यांच्या युपीआय-समर्थित ॲप्सचा वापर करून ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel