Current Affairs | चालू घडामोडी | 04 FEB 2024
1) 4 फेब्रुवारी
- विश्व कर्करोग दिन
- थीम (2022-24) = Close the care gap
- जनता साप्ताहिकाचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले = 4 फेब्रुवारी 1956
2) जैस्वाल भारताचा तिसरा सर्वांत युवा द्विशतकवीर
- इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने २०९ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो भारताचा तिसरा सर्वांत युवा फलंदाज ठरला आहे.
- तब्बल १५ वर्षांनंतर एखाद्या डावखुऱ्या भारतीय फलंदाजाला कसोटीत द्विशतक करण्यात यश आले आहे. यापूर्वी गौतम गंभीरने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०६ धावांची खेळी केली होती.
- भारताचा 25 वा द्विशतक करणारा फलंदाज
3) भाजपचे ज्येष्ठ नेेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर करण्यात आला.
- भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी देशाच्या राजकारणात मोलाचे योगदान दिले.
- ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराचीत जन्म झालेले अडवाणी १९४२ साली रा.स्व. संघात आले.
- एप्रिल १९७० साली, इंद्रकुमार गुजराल यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्याने राज्यसभेतील एक जागा रिक्त झाली. जनसंघाने अडवाणी यांना या जागेसाठी उमेदवारी दिली आणि पक्षाच्या परिषदेतील बहुमतामुळे अडवाणी निवडून आले.
- अडवाणी यांनी काही आठवड्यांतच, राम मंदिरासाठी पाठिंबा मिळवण्याकरता सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेची घोषणा केली.
- २५ सप्टेंबर १९९० रोजी ही रथयात्रा सुरू झाली. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांना या यात्रेच्या गुजरातमधील प्रवासाच्या संयोजनात मदत केली होती. या यात्रेने अडवाणी यांना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले.
- 1998-2004 देशाचे गृहमंत्री व उपपंतप्रधान
- भारतरत्न पुरस्कार मिळणारे अडवाणी हे ५० वे व्यक्ती आहेत.
4) महाराष्ट्रातील 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत
5) रत्नागिरीत उभारण्यात आला छत्रपती संभाजी राजेंचा सर्वात उंच पुतळा
6) Multidimensional Poverty Index
- OPHI & UNDP व्दारे 2010 पासून
- Dimensions – (निर्देशक)
- SHE – Standard of Living, Health, Education.
- Poverty – Bihar Highest, Kerala Lowest. (State)
- – 33%
- निती आयोगाने तयार केलेल्या निर्देशांकात 2 नवीन मुद्दे समाविष्ट केलेले आहेत.
- Maternal health (माता आरोग्य)
- Bank account (बँकेचे खाते)
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel