चालू घडामोडी | Current Affairs | 04 NOV 2023
1) आगरतळा (त्रिपुरा) ते अखौरा (बांग्लादेश) रेल्वेमार्गाचे उद्घाटन.
- पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान ‘शेख हसीना’ यांनी त्रिपुराची राजधानी ‘आगरतळा’ ते बांग्लादेशातील ‘अखौरा’ या रेल्वेमार्गाचे लोकार्पण केले.
- या प्रकल्पामुळे दोन्ही देशांतील पर्यटन, मालवाहतूक व्यापार यांना चालना मिळू शकते.
2) जगातली पहिली ‘कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षितता शिखर परिषद’.
- ‘कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षितता शिखर परिषद’ (AI Safety Summit) ही नुकतीच ब्रिटनमधील ‘ब्लेचली पार्क’ येथे झाली.
- या परिषदेच्या अखेरीस ब्लेचली जाहिरनामाही प्रसृत करण्यात आला.
- भविष्यात हा जाहीरनामा ‘AI च्या व्यापक नियमनाला आकार देईल.
- कृत्रिम बुद्धिमतेचा वापर कुठे?
- जवळपास सर्वच महत्वाच्या क्षेत्रांत याचा वापर करून जीवन सुकर करण्याचे मार्ग शोधले जात आहेत.
- शल्यचिकित्सा, रोगनिदान, हवामान भाकीत, अंतराळ संशोधन, धान्यपीक निश्चिती, उच्च शिक्षण, खेळांमधील व्यूहरचना, सत्यरोग नियंत्रण अशा क्षेत्रांत या AI चा विधायक वापर होऊ शकतो.
- परंतु जगभरातील बँकिंग यंत्रणा, भांडवली बाजार, उपग्रह संचार यंत्रणा, दूरसंचार यंत्रणा यांना AI द्वारे लक्ष्य करता येऊ शकते.
- निवडणूक प्रक्रिया, जैविक / रासायनिक अण्वस्त्रे AI द्वारे डागली जाऊ शकतात.
- AI च्या वापरामुळे मोठ्या प्रमानावर रोजगारांवर गदा येऊ शकते.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel