Current Affairs | चालू घडामोडी | 05 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 05 APR 2024

1) राष्ट्रीय समुद्री दिवस (National Maritime Day)

  • भारतीय मालकीचे पहिले जहाज एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडन कडे रवाना = 5 एप्रिल 1919
  • पहिल्यांदा साजरा 5 एप्रिल 1964

2) मणिपूरच्या बिंद्याराणी देवीने घडवला इतिहास! बनली वेटलिफ्टिंग विश्वचषकात पदक जिंकणारी पहिली भारतीय.

  • तिने या स्पर्धेत रजत पदक जिंकले

3) देशातील पहिला ‘त्रिदल तळ’ हा मुंबईत उभा राहणार

  • तसा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने तयार केला असून त्यावर तिन्ही दलांकडून अभ्यास सुरू आहे.
  • देशाच्या तिन्ही दलांनी संयुक्त मोहिमा कराव्यात, या मोहिमा करताना तिन्ही दलांनी एकमेकांच्या सामग्रीचा उपयोग करावा, असे भारताचे संरक्षण व सामरिक धोरण आहे. याच धोरणाला अनुसरून या तळाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

4) दक्षिण कोरियाने बनवला कृत्रिम सूर्य

  • दक्षिण कोरियाने कृत्रिम सूर्यामध्ये 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान 48 सेकंदापर्यंत मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे.
  • हे तापमान सूर्याच्या गाभ्यापेक्षा सात पट जास्त आहे

5) सिमरन ब्रम्हदेव थोरात या मुलीने देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान मिळवला आहे.

6) ‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ‘अग्नी-प्राइम’ या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
  • ‘संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी)बरोबर ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजी अब्दुल कलाम बेटावरून अग्नी-प्राइम या क्षेपणास्त्राची चाचणी केली,’

7) भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

  • एका नव्या संशोधनानुसार १९९० ते २०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान ६.२ वर्षांनी वाढले.
  • याचवेळी भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढल्याचेही समोर आले आहे.
  • जागतिक आयुर्मानाबाबत अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेतीत संशोधकांनी संशोधन केले आहे. हे संशोधन लॅन्सेट या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे.
  • जागतिक पातळीवर करोना संकटामुळे १.६ वर्षांची घट
  • सर्वाधिक मृत्यू होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रोगांमध्ये करोना दुसऱ्या स्थानी पोहोचला.
  • सरासरी आयुर्मानातील वाढ (१९९० ते २०२१)
  • भूतान – १३.६ वर्षे
  • बांगलादेश – १३.३ वर्षे
  • नेपाळ – १०.४ वर्षे
  • भारत – ८ वर्षे
  • पाकिस्तान – २.५ वर्षे

8) मतदानाच्या शाईची वैशिष्ट्ये

  • कर्नाटक राज्यातील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लि. कंपनीमार्फत बनवली जाते.
  • निवडणूक विभागाच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केवळ मतदानासाठी ही शाई तयार करण्यात येते.
  • या शाईमध्ये ‘सिल्व्हर नायट्रेट’ या रसायनाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या निळ्या रंगाच्या शाईला लकाकी प्राप्त होते. ही शाई पुसण्याचा प्रयत्न केल्यास बोटाला इजा होण्याची शक्यता असते.

9) निवडणुकीचा इतिहास 17

  • अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
  • स्थापना = 1 जानेवारी 1998 ; चिन्ह = गवत
  • २६ वर्ष कॉंग्रेस पक्षामध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र जाण्याचा विचार करत तृणमूल काँग्रेस पक्षाची (TMC) स्थापना केली.
  • अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी 2009 ला लोकसभेपूर्वी व 2011 च्या विधानसभा निवडणुकीत माटी माणूस ही लोकप्रिय घोषणा दिली
  • या घोषणेच्या प्रभावाने तब्बल 34 वर्षांपासून असलेली डाव्या पक्षांची पश्चिम बंगालमधील सत्ता उलथवून तृणमूल काँग्रेसने आपली सत्ता स्थापन केली
  • त्यानंतर सलग तीन वेळा (2011, 2016 व 2021) ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये सत्ता राखली

10) अब्देल फताह एल-सिसी यांनी इजिप्तमध्ये तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली

  • ते 2030 पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहतील

11) हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2023

  • अशोक कुमार यांना वार्षिक पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
  • भारतीय हॉकी स्टार हार्दिक सिंग आणि सलीम शेटे यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले
  • वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक: पीआर श्रीजेश

12) भारत राष्ट्रीय सागरी सप्ताह 2024

  • 29 मार्च 2023 ते 5 एप्रिल 2023
  • 5 एप्रिल = राष्ट्रीय समुद्री दिवस

13) दोस्ती 16 युद्धसराव

  • भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्यात
  • या सरावाची 16 वी आवृत्ती = मालदीव

14) कर्करोगावरील पहिला स्वदेशी जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात

  • राष्ट्रपती द्रोपदीमुळे यांच्या उपस्थितीत प्रारंभ
  • उपचार प्रणालीचे नाव = सीएआर – टी सेल

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment