Current Affairs | चालू घडामोडी | 06 APR 2024
1) मिठाचा सत्याग्रह = 6 एप्रिल 1930
- दांडी = गांधीजी (साबरमती ते दांडी यात्रा)
- तामिळनाडू = सी राजगोपालचारी (तिरुचिरापल्ली ते वेदारण्यम)
- मलबार = के केलप्पन (कलिकत ते पोयनूर)
- धारासना = सरोजिनी नायडू
2) मनमोहन सिंग सक्रिय राजकारणातून निवृत्त
- देशाला आर्थिक मंदीतून सुखरुप बाहेर काढणारे अन् उदारिकरणाचं धोरणं अवलंबत भारताची अर्थव्यवस्था खुली करण्यात महत्वाचा वाटा उचलणारे माजी अर्थमंत्री आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे आता सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आहेत.
- तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर 3 एप्रिल 2024 रोजी त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला.
- मनमोहन सिंह हे अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. 1991 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. तेव्हा त्यांनी पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली.
- यानंतर ते 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. आता त्यांचं वय 91 वर्ष आहे.
- आता काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत.
3) निवडणुकीचा इतिहास 18
- भाजपने 1989 च्या निवडणुकीत पहिल्यांदा “राम लल्ला आयेंगे, मंदिर वही बनायेंगे” अशी घोषणा दिली
- भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेत हीच घोषणा पहिल्यांदा ठळकपणे देशभर पोचली
- अयोध्येत बंदिस्त असलेल्या राम लल्लाच्या मूर्तींचे टाळे काढण्याचा आदेश तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिला होता
- 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाले
4) निवडणुकीचा इतिहास 19
- भारतीय लोकशाहीची पहिली निवडणूक 1952 मध्ये घेण्यात आली
- या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस, डाव्यांसह सोशालिस्ट पार्टी, भारतीय जनसंघ, हिंदू महासभा, किसान मजदूर प्रजापक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन असे वेगवेगळ्या विचारांच्या अनेक पक्ष सहभागी झाले होते
- या निवडणुकीत 499 जागांपैकी 364 जागा काँग्रेसला मिळाल्या
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 16 जागा मिळवण्यास यश आले. यामुळे विरोधी पक्ष म्हणून याच पक्षाने काम पाहिले
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel