Current Affairs | चालू घडामोडी | 08 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 08 DEC 2023

1) पाकव्याप्त काश्मीर ही नेहरूंची चूक : गृहमंत्री अमित शहा

  • पाकव्याप्त काश्मीरवर भारताचा हक्क असून तिथल्या २४ जागा जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत राखीव आहेत. पूर्वी, जम्मूमध्ये ३७ जागा होत्या, आता ४३ आहेत. पूर्वी काश्मीरमध्ये ४६ होत्या, आता ४७ आहेत आणि पाकव्याप्त काश्मीर आमचाच असल्यामुळे तिथल्या २४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

2) ग्रीन कार्ड

  • अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात सादर करण्यात आलेले विधेयक मंजूर झाल्यास त्याचा अमेरिकेचे ‘ग्रीन कार्ड’ म्हणजे कायमच्या नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो स्थलांतरित कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
  • एका वर्षात एका देशातील केवळ सात टक्के स्थलांतरितांनाच ग्रीन कार्ड दिले जाते.
  • राजा कृष्णमूर्ती व प्रमिला जयपाल या भारतीय वंशाच्या काँग्रेस सदस्यांसह रिच मॅकॉर्मिक यांनी हे विधेयक अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह्ज) मांडले आहे. ‘ग्रीन कार्ड’साठी असलेली लांबलचक प्रतीक्षा यादी कमी करणे आणि रोजगार-आधारित व्हिसा देताना राष्ट्रा-राष्ट्रांतील भेदभाव संपविणे ही या विधेयकाची उद्दिष्टे असल्याचे सांगितले गेले आहे.

3) गुगलने नुकताच ChatGPT ला तोडीस तोड असा AI टूल Gemini लाँच केला आहे.

4) RBI ने UPI मध्ये दोन मोठे बदल जाहीर केले आहेत.

  • रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना देय देण्यासाठी व्यवहार मर्यादा ₹1 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवली आहे.
  • क्रेडिट कार्डची परतफेड, म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन आणि विमा प्रीमियम पेमेंट यांसारख्या आवर्ती पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा ₹15,000 वरून ₹1 लाख झाली.

5) शंभराव्या नाट्यसंमेलनाचा मान पिंपरी चिंचवडला.

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे ऐतिहासिक नाट्य संमेलन विभागवार होणार असले, तरी मुख्य उद्घाटन सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे.
  • संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष, तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वागत समिती अध्यक्ष आणि प्रमुख निमंत्रक म्हणून उद्याोगमंत्री उदय सामंत असणार आहेत. मुख्य संमेलन चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगणावर होणार आहे.

6) बीबीसी म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश संस्थेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे डॉ. समीर शाह यांची निवड.

7) जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक काय आहे?

  • या विधेयकाद्वारे जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायदा २०१९ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. या विधेयकानुसार, जम्मू-काश्मीर विधानसभेची सदस्यसंख्या १०७ वरून ११४ करण्यात आली आहे. त्यात पाकव्याप्त काश्मीरमधील २४ जागांचा समावेश आहे. त्यामुळे विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ११४ असली तरी प्रभावी सदस्यसंख्या ९० असेल.

8) रेवंत रेड्डी यांनी तेलंगणच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment