Current Affairs | चालू घडामोडी | 08 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 08 NOV 2023

1) काश्मीरमधील ताबा रेषेवर छत्रपतींचा पुतळा.

  • काश्मीर मधील कुपवाडा येथील भारत – पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
  • याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
  • ‘आम्ही पुणेकर’ संस्था आणि 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून पुतळा उभारण्यात आला.

2) बेरीयमयुक्त फटाक्यांवर देशव्यापी बंदी : सर्वोच्च न्यायालय.

  • बेरियमचे क्षार असलेले फटाके वाजविण्यावर लावलेली बंदी ही देशव्यापी असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले.
  • ‘बेरियम’ बद्दल
    • हा अल्कमृदा धातू (Alkaline Earth Metal) असून तो रासायनिकदृष्ट्या अस्थिर असतो. त्यामुळे तो मूलद्रव्याच्या रूपात सापडत नाही.
    • मात्र त्याची संयुगे (Compounds) आढळतात व ती अतिशय विषारी असतात.

3) ‘प्रलय’ ची यशस्वी चाचणी.

  • भारताने ‘प्रलय’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (SRBM) ओडिसाच्या किनारपट्टीजवळील अब्दुल कलाम बोटावरून यशस्वी चाचणी केली.
  • या क्षेपणास्त्राचा पल्ला 350-500 किमी चा असून 500 ते 1000 किलो वजन वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

4) आदित्य L-1 ची अचूक कामगिरी, सौरज्वालेची केली प्रथमच नोंद.

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य L1’ चे यशस्वी प्रक्षेपण केले होते.
  • यानंतर आता या यानाने सौरज्वालेची नोंद घेतली आहे.

5) ‘राज्यपाल’ विरुद्ध ‘राज्य सरकार’

  • विधानसभेने मंजूर केलेली विधेयके राज्यपाल संमत करत असल्याने पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा या चार बिगर भाजपशाहीत राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
  • यामध्ये राज्यघटनेतील 3 अनुच्छ्दे महत्वाची आहेत.
    1. अनुच्छेद 200
      • राज्यपालांनी विधेयकाला लवकरात लवकर संमती द्यावी किंवा फेरविचारर्थ विधानसभेकडे पाठावे.
      • यामध्ये कालमर्यादा निश्चित नाही.
    2. अनुच्छेद 163
      • मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी काम करावे.
    3. अनुच्छेद 361
      • सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना कोणतेही आदेश व निर्देश देऊ शकत नाही.
      • या अनुच्छेदानुसार भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल कोणत्याही न्यायालयीन कामकाजाला उत्तरदायी नसतात. त्यांना न्यायालयीन कक्षेतून सवलत देण्यात आली आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment