Current Affairs | चालू घडामोडी | 07 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 07 NOV 2023

1) एकही चेंडू न खेळता खेळाडू बाद होण्याची पहिली घटना.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘विलंबचित’ (Time out) होण्याची घटना ‘एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा, भारत, 2023’ मध्ये घडली.
  • श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू ‘अँजेलो मॅथ्यूज’ हा अशा पद्धतीने विलंबचित होणारा पहिला खेळाडू ठरला.
  • यावेळी बांग्लादेशचा गोलंदाज ‘शकीब – अल – हसन’ हा गोलंदाजी.
  • मुंबईतील वानखेडे मैदानावर श्रीलंका व बांग्लादेश यादरम्यान हा सामना चालू होता.

2) पहिले राष्ट्रीय सुरक्षा धोरण.

  • देशाच्या सुरक्षेची उद्दिष्टे निश्चित करणारे ‘राष्ट्रीय सुरक्षा धोरण’ (Natioanl Security Strategy) केंद्र सरकार तयार करणार आहे.
  • या सुरक्षा उद्दिष्टांची पूर्तता करण्याचे मार्गही यात नमूद असतील.
  • आतापर्यंत भारतात असे धोरण नव्हते मात्र आता त्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.
  • कोणत्या देशांत योजना ?
    • विकसित देशांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेबाबत धोरण राबवण्यात आले आहे.
    • अमेरिका, ब्रिटन, रशिया या देशांनी राष्ट्रीय सुरक्षा धोरण प्रसिद्ध केले आहे.
    • चीनमध्ये ‘Comprehensive National Security’ म्हणून हे धोरण ओळखले जाते.
    • पाकिस्तानने देखील गेल्या वर्षी अशा पद्धतीचे धोरण तयार केले होते.

3) राजधानी दिल्लीत पुन्हा ‘सम – विषम’ प्रणाली.

  • 13 ते 20 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू.
  • प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना.

4) दिवाळीसाठी सरकारतर्फे स्वस्त दरात ‘भारत आटा’ वितरण अभियान.

  • सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जनतेला स्वस्त दरात गव्हाचे पीठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 27.50 रुपये प्रती किलो अनुदानित दराने अभियान सुरुवात.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment