Current Affairs | चालू घडामोडी | 09 APR 2024
1) 9 एप्रिल
1.1) सार्वजनिक काका जयंती = 9 एप्रिल 1828
- नाव = गणेश वासुदेव जोशी
- कार्य = सार्वजनिक सभेच्या बांधणीत मोलाचे सहकार्य
- सार्वजनिक सभा = महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना
1.2) CRPF शौर्य दिवस = 9 एप्रिल
- 9 एप्रिल 1965 रोजी कच्छ च्या रणमध्ये सीआरपीएफच्या एका लहान तुकडीने 34 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले होते
- या लढाईत सीआरपीएफचे सहा जवान शहीद झाले होते. या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी शौर्य दिन साजरा केला जातो
2) न्या. शुक्रे मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
- महत्वाच्या नोंदी….
- अंधश्रद्धा, रूढी पाळण्याचे प्रमाण ४३.४० टक्के
- ३१.१७ टक्के मराठा समाज भूमिहीन
- कच्च्या घरांत राहणाऱ्यांचे प्रमाण ८१.८१ टक्के
- सरकारी नोकरदारांतही घट :-
- शुक्रे आयोगाच्या अहवालानुसार सरकारी सेवेतील मराठा समाजातील नोकरदारांचे प्रमाण २०२४मध्ये नऊ टक्के इतके आहे.
- गायकवाड समितीच्या अहवालानुसार २०१८ मध्ये हे प्रमाण १४.६३ टक्के इतके होते तर,
- नारायण राणे समितीने २०१४मध्ये दिलेल्या अहवालात हेच प्रमाण १४.६८ टक्के असल्याचे म्हटले होते.
3) मागासवर्गीय आयोग
- भारताच्या राष्ट्रपतींच्या मान्यतेने भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत राष्ट्रपती आदेशाद्वारे, “सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीची चौकशी” करण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य वाटतील अशा व्यक्तींचा नेतृत्वाखाली आयोग नियुक्त करू शकतात.
- आतापर्यंतचे मागासवर्गीय आयोग
- 1st मागासवर्गीय आयोग :-
- स्थापना:- 29 January 1953
- अंतिम अहवाल:- 30 मार्च 1955 रोजी सादर
- अध्यक्ष : काकासाहेब कालेलकर
- कार्य:- सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या परिस्थितीचा व पार्श्वभूमीचा अभ्यास करणे व ‘शैक्षणिकदृष्ट्या मागास’ म्हणून लोकांची निवड करण्याचे निकष ठरवले.
- अहवाल:- ज्यामध्ये असे म्हटले होते की भारतात 2399 मागास गट आहेत. त्यापैकी 837 ‘सर्वात मागास’ आहेत आणि मागासलेपणाचा प्रमुख पुरावा म्हणून जातीचा उल्लेख केला.
- तथापि, केंद्र सरकारने, जातविहीन समाज निर्माण करण्याच्यादृष्टीने, शिफारसी नाकारल्या.
- 2nd मागासवर्गीय आयोग :-
- स्थापना:- 1 जानेवारी 1979
- अंतिम अहवाल:- 31 डिसेंबर 1980
- अध्यक्ष:- B.P. मंडल (बिहारचे CM)
- मुख्य उद्देश:- भारतातील सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची ओळख करून देणे आणि जातीय असमानता आणि भेदभाव दूर करण्यासाठी आरक्षणाचा विचार करणे हे मंडल आयोगाचे मुख्य उद्देश होते .
- वैशिष्ट्ये:- मागासलेपणा निश्चित करण्यासाठी अकरा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निर्देशक वापरले
- शिफारसी:- ओबीसीना सरकारी नोकरीत आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली.
- 3rd इतर मागासवर्गीय आयोग :-
- स्थापना:- 2 ऑक्टोबर 2017
- अहवाल: 31 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर
- रचना :- चार सदस्यीय आयोग)
- अध्यक्ष:- दिल्ली H.C च्या माजी मुख्य न्या. जी.राहिणी
- 1st मागासवर्गीय आयोग :-
- सदस्य:-3
- जे.के. बजाज (चेन्नईच्या सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजचे संचालक)
- गौरी बसू (भारतीय मानवशास्त्रीय सर्वेक्षण संचालक, कोलकाता)
- विवेक जोशी (रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त)
- समितीचे सचिव:- यू. वेंकटश्वरालू
- या आयोगाला आत्तापर्यंत 14 वेळा मुदत वाढ देण्यात आली होती.
- उद्देश : ओबीसींमधील अधिक मागासलेल्यांना आरक्षणाच्या फायद्यांचा लाभ घेता यावा यासाठी आणि आरक्षणाच्या लाभांचे अधिक न्याय्य वितरणाचे सुनिश्चितीकरण आणि ओबीसींमध्ये उप-वर्गीकरण करता येईल असे निकष आणि मापदंड ठरवणे.
4) आगामी साहित्य संमेलनासाठी सहा निमंत्रणे
- साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. २ ते ४ फेब्रुवारी 2023 या कालावधीत झालेले हे संमेलन रसिकांनी फिरवलेली पाठ आणि असुविधांमुळे साहित्यिकांसह सामान्य साहित्यप्रेमींची झालेली गैरसोय या कारणांनी गाजले होते.
- ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी इचलकरंजी, औदुंबर, औंध संस्थान, दिल्ली, मुंबई आणि धुळे अशा सहा ठिकाणांहून निमंत्रणे आली आहेत.
5) ‘शाळापूर्व तयारी अभियान’ एप्रिल ते जूनदरम्यान
- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल ते जून या कालावधीत ‘शाळापूर्व तयारी अभियान’ राबवले जाणार आहे.
- त्यात राज्यस्तरीय प्रशिक्षणापासून शाळा, अंगणवाडी स्तरापर्यंतच्या मेळाव्यांचा समावेश आहे.
6) मालदीवच्या निलंबित मंत्र्याकडून भारताची पुन्हा आगळीक
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानास्पद शेरेबाजी केल्यामुळे जानेवारीमध्ये कारवाईची नामुष्की ओढवलेल्या मालदीवच्या निलंबित मंत्री मरियम शिउना यांनी भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याची खिल्ली उडवली.
- मालदीवमधील विरोधी पक्ष असलेल्या ‘मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टी’च्या (एमडीपी) मोहिमेवर टीका करताना त्यांनी तिरंग्याचा अपमान केला. जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी ‘एक्स’वरील स्वत:ची पोस्ट मागे घेतली.
7) सुमित नागलचा एटीपी मास्टर्स मुख्य फेरीत विजय
- एटीपी मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा सुमित नागल हा भारताचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे
8) सर्वाधिक दिव्यांग मतदार असलेली राज्ये
- उत्तर प्रदेश
- बिहार
- ओरिसा
- आंध्र प्रदेश
- तेलंगाना
9) प्रा. मीना चरांदा यांना आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024
- त्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान मिळालेला आहे
10) भारताचा पहिला लष्करी दर्जाचा भूस्थानिक (Geospatial) उपग्रह TSAT-1A प्रक्षेपित
- हा भारताचा पहिला खाजगी हेरगिरी उपग्रह आहे. हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे
- Tata Advanced Systems Ltd (TASL) या Tata Sons च्या उपकंपनीने संपूर्णपणे खाजगी क्षेत्राद्वारे बांधलेला भारताचा पहिला लष्करी दर्जाचा भू-स्थानिक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे.
- SpaceX च्या Falcon 9 रॉकेटचा वापर करून फ्लोरिडा, युनायटेड स्टेट्समधील केनेडी स्पेस सेंटरमधून TSAT-1A हा प्रक्षेपित करण्यात आला.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel