Current Affairs | चालू घडामोडी | 09 DEC 2023
1) झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) चे नेते लालदूहोमा यांनी मिझोराम चे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- मिझोरममध्ये सत्ताबदल होऊन झोरम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) या सहा छोटे पक्ष आणि नागरी संस्था यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पक्षाला सत्ता मिळाली आहे.
- भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) निवृत्त अधिकारी लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखालील झेडपीएम पक्षाने मिझो नॅशनल फ्रंट या मिझोरममधील पारंपरिक प्रादेशिक पक्षाचा पराभव केल्याने आता ७४ वर्षीय लालदुहोमा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारतील.
- मिझोरमला १९८७ मध्ये राज्याचा पूर्ण दर्जा मिळाल्यापासून मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेस हे दोनच पक्ष सत्तेत होते
- मिझोरम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनलिस्ट पार्टी, झोरम एक्सोडस मुव्हमेंट, झोरम दोन वेगवेगळे फ्रंट, मिझोरम पीपल्स फ्रंट असे सहा छोटे स्थानिक पक्ष तसेच नागरी संस्था यांनी एकत्र येऊन झोरम पीपल्स मुव्हमेंट या पक्षाची 2017 मध्ये स्थापना केली होती.
- राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पक्षांतरबंदी कायदा लागू झाल्यावर अपात्र ठरणारे लालदुहोमा हे अपात्र ठरणारे पहिले खासदार ठरले होते.
- मिझो नॅशनल फ्रंट हा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष आहे.
2) पी एम किसान व्याप्ती अभियान.
- 15 जानेवारीपर्यंत अभियान चालू राहील.
3) तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द.
- नितीपालन समितीने सादर केलेल्या अहवालात त्या दोषी आढळल्या.
- तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे नीतीपालन समिती (Ethics Committee) चर्चेत आली आहे. त्यामुळे त्यावरील प्रश्न अपेक्षित आहे.
( #GS2 मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ) - संसदेच्या प्रत्येक सभागृहाची स्वतःची नीतीपालन समिती असते.
- लोकसभेची नीतीपालन समिती (Ethics Committee)
- लोकसभेतील नीतीपालन समितीची स्थापना 2000 मध्ये करण्यात आली.
- रचना: यात पंधरापेक्षा जास्त सदस्य नसतात आणि सभापतींनी नामनिर्देशित केले असते.
- मुदत: ते एका वर्षापेक्षा जास्त नसलेल्या मुदतीसाठी पदावर राहतील.
- राज्यसभेत नीतीपालन समिती
- स्थापना 1997 मध्ये झाली.
- रचना: यात राज्यसभेच्या अध्यक्षांद्वारे नामनिर्देशित 10 सदस्य असतात.
- टर्म: ते एका वर्षापेक्षा जास्त नसलेल्या मुदतीसाठी पद धारण करतील.
- विशेषाधिकार समिती
- नीतीपालन समिती आणि विशेषाधिकार समितीचे कार्य अनेकदा एकमेकांशी जुळते.
- खासदारावरील भ्रष्टाचाराचा आरोप कोणत्याही एका संस्थेकडे पाठवला जाऊ शकतो, परंतु सहसा अधिक गंभीर आरोप विशेषाधिकार समितीकडे जातात.
- विशेषाधिकार भंगासाठी खासदाराची तपासणी केली जाऊ शकते; गैर-खासदारावरही सभागृहाच्या अधिकारावर आणि प्रतिष्ठेवर आघात करणार्या कृतींसाठी विशेषाधिकार भंगाचा आरोप लावला जाऊ शकतो.
- नीतीपालन समिती फक्त खासदारांच्या गैरवर्तणुकीचीच प्रकरणे हाताळू शकते.
4) TIME Athelete ऑफ द इयर – लिओनेल मेस्सी.
5) केशवानंद भारती निकाल 10 भारतीय भाषांमध्ये.
- निकालाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel