Current Affairs | चालू घडामोडी | 10 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 10 JUN 2024

1) 10 जून

1.1) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना = 10 जून 1999

 • शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांनी स्थापना केली

1.2) उदय एक्स्प्रेस उद्घाटन = 10 जून 2018

 • UDAY (Utkrisht Double Decker Air-Conditioned Yatri)
 • ही ट्रेन दुमजली वातानुकूलिन आहे
 • पहिला मार्ग = कोइंबतूर ते बंगलोर
 • दुसरा मार्ग = विशाखापट्टणम ते विजयवाडा

2) स्पेनच्या कार्लोस अल्कराझने कारकीर्दीत प्रथमच फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.

 • उपविजेता = जर्मनीचा ॲलेक्झांडर झ्वेरेवचे
 • फ्रेंच स्पर्धा जिंकणारा स्पेनचा सातवा खेळाडू.

3) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.

 • एकूण शपथ घेतलेले मंत्री = 72
  • पंतप्रधानांसह कॅबिनेट मंत्री = 31
  • राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) = 5
  • राज्यमंत्री = 36
 • सर्वाधिक मंत्री = उत्तर प्रदेश (10)
 • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची सर्व मंत्र्यांना शपथ दिली

4) केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश

 • सहा मंत्र्यांपैकी चार खासदार भाजपचे, एक शिवसेना व एक रिपब्लिकन पक्षाचे आहेत
 • कॅबिनेट मंत्री
 1. नितीन गडकरी (नागपूर)
 2. पीयूष गोयल (मुंबई)
 • राज्यमंत्री
 1. मुरलीधर मोहोळ (पुणे)
 2. रक्षा खडसे (रावेर)
 3. रामदास आठवले (रिपब्लिकन पक्ष) (राज्यसभा खासदार)
 • राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
 1. प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट) (बुलढाणा)

5) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन नरेंद्र मोदी यांनी केली पंडित जवाहरलाल नेहरूंची बरोबरी

 • सर्वात तरुण मंत्री = राम मोहन नायडू (TDP) – वय 36
 • सर्वात वयोवृद्ध मंत्री = जीवन राम मांझी (हिंदुस्तानी अवाम मंच – HAM) – वय 79
 • सर्वात श्रीमंत मंत्री = चंद्रशेखर पेम्मासानी (TDP)

6) तिसऱ्यांदा अंतराळ प्रवास करून सुनीता विलियम्सने रचला इतिहास

 • भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्सने अंतराळासाठीच्या सर्वात पहिल्या संपूर्ण क्रू मिशनच्या बोईंग स्टारलाइनरची पहिली महिला पायलट बनून हा इतिहास (5 जून 2024) घडवला आहे.
 • फ्लोरिडा मधील केप कॅनाव्हरल स्पेस स्टेशनवरून प्रक्षेपित केले गेलेले आणि सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सुरक्षितपणे डॉक केलेले हे पहिले ‘ह्यूमन रेटेड स्पेसक्राफ्ट’ आहे.

7) सरबज्योत सिंगने नेमबाजीत सुवर्ण जिंकले

 • जर्मनीतील म्युनिच येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (ISSF) विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळाले.
 • सरबज्योत सिंगने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे

8) पाकिस्तान बनला UNSC चा अस्थायी सदस्य

 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) चे 5 अस्थायी सदस्य निवडण्यासाठी मतदान घेण्यात आले
 • यामध्ये पाकिस्तानची तात्पुरती सदस्य म्हणून निवड करण्यात आली
 • 193 सदस्यीय UNSC ने गुप्त मतदानाद्वारे 5 देशांची निवड केली.
 • पाकिस्तान शिवाय डेन्मार्क, ग्रीस, पनामा आणि सोमालिया या देशांचीही निवड झाली आहे.
 • या देशांनी UNSC मध्ये जपान, इक्वेडोर, माल्टा, मोझांबिक आणि स्वित्झर्लंडची जागा घेतली आहे. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2024 रोजी संपणार आहे.
 • UNSC मध्ये एकूण 15 सदस्य देश आहेत. त्यापैकी 5 कायमस्वरूपी आणि 10 अस्थायी देश असतात.
 • स्थायी सदस्यांमध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन यांचा समावेश आहे
 • सुरक्षा परिषदेत 2 वर्षांसाठी 10 अस्थायी देशांचा समावेश आहे

9) पूजा तोमर UFC मध्ये बाऊट जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment