Current Affairs | चालू घडामोडी | 09 JUN 2024
1) राज्यसभेच्या दोन जागा रिक्त
- राज्यसभा किंवा विधान परिषद सदस्य लोकसभा वा विधानसभेवर निवडून आल्यास सदस्यत्व आपोआपच रद्द होते
- लोकसभेत निवडून आलेले विद्यमान लोकप्रतिनिधी
- पियूष गोयल (मुंबई उत्तर, भाजप) – राज्यसभा
- उदयनराजे भोसले (सातारा, भाजप) – राज्यसभा
- विधानसभा आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यास भारताच्या राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या मुदतीत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो.
- या मुदतीत राजीनामा न दिल्यास त्याची लोकसभेची जागा आपोआपच रिक्त होते.
- १९९९ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा सदस्य गुरुचरणसिंग तोहरा यांनी लोकसभेवर निवडून येऊनही १४ दिवसांत राजीनामा दिला नव्हता. परिणामी त्यांची लोकसभेची जागा रिक्त झाली होती.
- महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले आमदार
- बळवंत वानखडे (अमरावती, काँग्रेस)
- प्रणिती शिंदे (सोलापूर, काँग्रेस)
- संदिपान भूमरे (औरंगाबाद, शिवसेना शिंदे गट)
- रविंद्र वायकर (वायव्य मुंबई, शिवसेना शिंदे गट)
- वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई काँग्रेस)
- प्रतिभा धानोकर (चंद्रपूर, काँग्रेस)
2) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा शपथविधी सोहळा आज म्हणजे 9 जून रोजी संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनामध्ये होत आहे.
3) पंतप्रधानाच्या शपथविधीसाठी परदेशी पाहुण्यांची उपस्थिती
- श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे
- मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू
- सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ
- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना
- मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ
- नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’
- भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे
यांनी समारंभाची निमंत्रणे स्वीकारली आहेत.
- २०१४ मध्ये मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्यावेळी सार्क देशांचे नेते उपस्थित होते.
4) दिग्गज माध्यमकर्मी आणि रामोजी ग्रुपचे अध्यक्ष सीएच रामोजी राव यांचे निधन
- ईनाडू वृत्तपत्र आणि ईटीव्ही वृत्तवाहिनी समूहासह अविभाजित आंध्र प्रदेशातील माध्यम उद्योगात त्यांचे प्रचंड योगदान आहे
- जन्म = १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात
- त्यांनी १९६२ मध्ये ‘मार्गदर्शी चिट फंड’ सुरू केला.
- १९६९ मध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नदाता हे मासिक सुरू करून माध्यम क्षेत्रात पाऊल ठेवले.
- १९७४ मध्ये त्यांनी विशाखापट्टणम शहरात स्थापन केलेल्या ‘ईनाडू’ने वृत्तपत्र क्षेत्रात क्रांती घडवली
- रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद याची स्थापना देखील त्यांनीच केली
- पुरस्कार = पद्मविभूषण (२०१६)
5) माजी अंतराळवीर विल्यम अँडर्स यांचे विमान अपघातात निधन
- ‘अपोलो-८’चे अंतराळवीर असलेल्या विल्यम यांनी १९६८ मध्ये अंतराळातून निळ्या संगमरवरी सावलीच्या रूपात ग्रह दर्शवणारे (अवकाशातून उगवणाऱ्या पृथ्वीचे काढलेले छायाचित्र) ‘अर्थराईज’ छायाचित्र जगभरात प्रसिद्ध झाले होते
- हे छायाचित्र अंतराळातून पृथ्वीची पहिली रंगीत प्रतिमा असून, आधुनिक इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या छायाचित्रांपैकी एक आहे. अंतराळातून पृथ्वी किती नाजूक आहे हे दाखवण्यासाठी जागतिक पर्यावरण चळवळीला चालना देण्याचे श्रेय या छायाचित्राला दिले जाते.
6) फ्रेंच स्पर्धेच्या महिलांच्या अंतिम लढतीत पोलंडच्या ईगा श्वीऑटेकची इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीवर मात
- फ्रेंच स्पर्धेचे चार वेळा विजेतेपद मिळवणारी ती सर्वांत युवा टेनिसपटू ठरली. तिने अमेरिकन स्पर्धाही एकदा जिंकली आहे.
7) टाटा, रिलायन्स आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया टाइम मॅगझिन ग्लोबल 100 सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत
- वार्षिक टाइम्स मॅगझिन ग्लोबल 100 सर्वात प्रभावशाली कंपन्यांची ही चौथी आवृत्ती होती. अमेरिकन टाइम मासिकाने 2021 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित केली होती.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel