Current Affairs | चालू घडामोडी | 11 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 11 DEC 2023

1) मानवी हक्कांचा जाहीरनामा (UDHR) 10 डिसेंबर 1948 ला जाहीर केला होता त्याला 75 वर्षे पूर्ण झाली.

2) कोयना प्रलयकारी भूकंपात आज ५६ वर्ष पूर्ण.

  • ११ डिसेंबर १९६७ ला झाला होता भूकंप.

3) पर्वतांच्या संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 डिसेंबर हा दिवस ‘आतंरराष्ट्रीय पर्वत दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

  • या वर्षी पर्वत दिवस साजरा करताना संयुक्त राष्ट्रसंघटनेनं ‘शाश्वत पर्वतीय पर्यटन’ (sustainable mountain tourism) अशी थीम तयार केली आहे. पर्वतीय प्रदेशातील पर्यटनाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी जगातील राष्ट्रांनी प्रयत्न करावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघटनेनं केलं आहे.
  • संयुक्त राष्ट्रसंघटनेमध्ये 1992 साली ‘अजेंडा 21’ या 21 व्या शतकातील जैवविविधतेचे संवर्धनासंबंधी महत्वपूर्ण आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये 13 वा मुद्दा हा “Managing Fragile Ecosystems: Sustainable Mountain Development” होता. यामध्ये पर्वतीय जैवविविधतेच्या शाश्वत विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं.
  • पर्वतांचं पर्यावरणातील महत्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघटनेनं 2002 वर्ष हे ‘आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष’ या स्वरुपात साजरं केलं आणि 11 डिसेंबर 2003 पासून ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला.

4) छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचे आदिवासी नेते विष्णू देव साय.

5) देशातील संभाव्य साखरसंकट टाळण्यासाठी ऊसाचा रस आणि साखरेच्या अर्कापासून इथेनॉलनिर्मिती करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली.

  • कोणत्याही नैसर्गिक पिष्टमय पदार्थापासून- (म्हणजे ज्यात शर्करा आहेत अशा)- इथेनॉल तयार करता येते. बटाटा, रताळे, मका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊस यांपासून इथेनॉल निर्मिती शक्य असते आणि हे इंधन प्रचलित इंधनास पर्याय ठरू शकते.
  • ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश.
  • केंद्रीय अन्न मंत्रालयाने देशातील सर्व साखर कारखानदारांस पत्रे लिहून ‘पहिल्या धारेचे’ इथेनॉल तयार करण्यास बंदी घातली. उसाचा रस उकळवून तयार झालेली मळी साखर निर्मितीसाठी पाठवली जाते ती ‘पहिली धारे’ची. ही मळी आता इथेनॉलसाठी वापरता येणार नाही. साखर निर्मिती झाल्यानंतरही जी दुसऱ्या धारेची मळी उरते, ती मात्र अजूनही इथेनॉलसाठी वापरता येईल.

6)आदित्य एल १’च्या दुर्बिणीकडून सूर्याची प्रकाशचित्रे प्राप्त.

  • सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या आदित्य एल १ या सौर मोहिमेत समाविष्ट असलेल्या ‘सोलर अल्ट्राव्हॉयोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (सूट = SUIT) या दुर्बिणीने महत्त्वाची कामगिरी केली आहे.
  • सूट या दुर्बिणीची निर्मिती पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्राो) यांनी केली आहे.
  • सूर्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच अतिनील तरंगलांबीतील अद्यायावत निरीक्षणे ‘सूट’मुळे मिळू शकणार आहेत. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सूर्याच्या अतिनील किरणांचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.

7) भूतानमधील ट्रोंग्सा येथे नानाराव पेशवे (दुसरे) यांचा 1857 च्या उठावानंतरचा मुक्काम.

8) महाराष्ट्र दंगलीतही देशात अव्वल.

  • NCRB अहवालात बाब समोर.
  • हत्यांमधे महाराष्ट्र तिसरा.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment