Current Affairs | चालू घडामोडी | 11 MAY 2024
1) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
- पोखरण येथील अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी हा दिवस
- ऑपरेशन शक्ती = 1998 मध्ये 11 आणि 13 मे रोजी भारताने अनेक भूमिगत अणुचाचण्या करून आपले वैज्ञानिक आणि तांत्रिक पराक्रम प्रदर्शित केले
- हंसा 3 = पहिले भारतीय बनावटीच्या विमानाची चाचणी = 1998
2) राकेश मोहन यांची जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती
- जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी राकेश मोहन यांची नियुक्ती केली आहे.
- जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या सरकारांना कर्ज आणि अनुदान देते.
स्थापना :- 1944
अध्यक्ष : अजय बंगा.
संस्थापक: जॉन मेनार्ड केन्स, हॅरी डेक्सटर व्हाईट.
मुख्यालय: वॉशिंग्टन, डीसी, यूएसए
- राकेश मोहन यांच्या विषयी
- राकेश मोहन सध्या नवी दिल्लीस्थित थिंक टँक ‘सेंटर फॉर सोशल अँड इकॉनॉमिक प्रोग्रेस’ (CSEP) मध्ये अध्यक्ष एमेरिटस आणि प्रतिष्ठित फेलो म्हणून काम करत आहेत.
- ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अर्धवेळ सदस्य देखील आहेत.
- मोहन यांनी भूतकाळात अनेक प्रतिष्ठित पदे भूषविली आहेत
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्डावर कार्यकारी संचालक
- अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार सचिव मुख्य आर्थिक सल्लागार
- उद्योग मंत्रालयातील आर्थिक सल्लागार
3) ‘ऑपरेशन मंडे होल्ड’अंतर्गत १२२ संशयीत कंटेनर थांबवले
- जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) आयात करण्यात आलेले सुमारे १२२ कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
- नवी मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर तपासणी सुरू
4) 2023-24 मध्ये 115 देशांमध्ये भारताच्या निर्यातीत सकारात्मक वाढ
- केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये भारताच्या निर्यातीत एकूण 238 देश/प्रदेशांपैकी 115 देशांमध्ये सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.
- अमेरिका, UAE, नेदरलँड्स, चीन, UK, सौदी अरेबिया, सिंगापूर, बांगलादेश, जर्मनी आणि इटली या प्रमुख निर्यात बाजारपेठांमध्ये निर्यातीत सकारात्मक वाढ नोंदवली गेली
- भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा मिळून) गेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.
- व्यापारी मालांच्या निर्यातीत घट नोंदवली गेली तर सेवा क्षेत्र निर्यातीत वाढ नोंदवली गेली
- जागतिक निर्यात बाजारपेठेतील भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातीचा वाटा 2014 मधील 1.70 टक्क्यांवरून 2023 मध्ये 1.82 टक्क्यांपर्यंत वाढला आहे
- 2023-24 मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ होती, ज्याने 12.71 टक्के वाढ नोंदवली. UAE ला भारताची व्यापारी मालाची निर्यात $35.6 अब्ज होती
5) ‘इस्रो’चा महत्त्वाचा टप्पा. ‘थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजिन’ विकसित करण्यात यश
- कच्च्या मालामध्ये ९७ टक्के तर उत्पादन वेळेत ६० टक्क्यांची बचत करणारे ‘थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजिन’ विकसित करण्यात ‘इस्रो’ल यश मिळाले आहे.
- अत्याधुनिक ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (एएम) तंत्रांचा वापर करून हे इंजिन विकसित करण्यात आले आहे. सामान्य भाषेत याला ‘थ्रीडी प्रिटिंग’ असे म्हणतात.
- हे इंजिन पूर्णपणे भारतामध्ये विकसित करण्यात आल्याचेही ‘इस्राो’कडून सांगण्यात आले.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel