Current Affairs | चालू घडामोडी | 12 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 12 OCT 2023

1) ऑपरेशन अजय

  • इस्राइल मधून 20 हजार भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने मोहीम सुरू केली.
  • गाझा पट्टीमधील पॅलेन्स्टाइनच्या दहशतवादी गट ‘हमास’ ने अचानक इस्राइल वर हमला करून युद्धाची सुरुवात केली होती.
  • आजवरच्या प्रमुख मोहीमा.
    1. ऑपरेशन कावेरी (2023) = सुदान गृहयुद्ध
    2. ऑपरेशन दोस्त (2023) = टर्की भूकंप मदत
    3. ऑपरेशन गंगा (2022) = युक्रेन रशिया युद्ध
    4. ऑपरेशन देवी शक्ति (2021) = अफगाणिस्तान तालिबान गृहयुद्ध
    5. ऑपरेशन वंदे भारत, समुद्र सेतु (2020) = करोना महामारी

2) 26 व्या आठवड्यात गर्भपाताबाबत मतभिन्नता.

  • विवाहित महिलेला 26 व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी देणारा आदेश मागे घ्यावा अशी विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने विभाजित निर्णय दिला.
  • न्या. हिमा कोहली यांनी गर्भपाताबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केले तर न्या. नागरत्न यांनी पाठिंबा दिला.

3) पठाणकोट हल्ल्यातील प्रमुख सूत्रधाराची पाकिस्तानात हत्या.

  • पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ‘जैश-ए-मोहम्मद’ चा दहशतवादी ‘शाहिद लतीफ’ ची पाकिस्तानातच हत्या.
  • भारताच्या UAPA कायद्यांतर्गत दहशतवादी म्हणून घोषित होता.

4) ‘मेरा युवा भारत’ संस्था.

  • देशातील 15 ते 29 वयोगटातील तरुणांच्या विकासासाठी केंद्राची युवा डिजिटल शाखा उघडली जाणार असून त्याचे नाव ‘माय भारत’ असे नामकरण केले जाईल.
  • ही नवी संस्था देशातील तरुणांच्या नेतृत्व क्षमतांचा व कौशल्यांचा विकास करण्यासाठी उभारली जाणार.
  • लोकार्पण = 31 ऑक्टोबर 2023
  • मंत्रालय = केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय.
  • तरूणांसाठीची दुसरी संस्था = ‘नेहरू युवा संघटन केंद्र’ (NYK)

5) विश्वचषक सामन्यांत रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम जमा.

  • भारत – अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने धडाकेबाज 131 धावांची खेळी करून अनेक विक्रम स्वत:च्या नवे केले.
    5.1) सलामीवीर म्हणून सर्वाधित शतकांमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी.
    5.2) वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार रोहितच्या नावे.
    • रोहित शर्मा – 556
    • ख्रिस गेल – 553
  • 5.3) वनडेत सर्वाधिक शतके
    1. सचिन तेंडुलकर = 49
    2. विराट कोहली = 47
    3. रोहित शर्मा = 31
    4. रिकी पॉटिंग = 30
  • 5.4) विश्वकरंडकात सर्वाधिक शतके
    • रोहित शर्मा = 7 (19 सामने)
    • सचिन तेंडुलकर = 6 (44 सामने)
    • रिकी पॉटिंग = 5 (42 सामने)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment