1) ‘समुद्रयान’
- यशस्वी चंद्रयान मोहिमेनंतर भारत ‘समुद्रयान’ मोहिमेची तयारी करत आहे.
- या प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशी बनावटीच्या पाणबुडीतून 3 संशोधकाना समुद्रात 6000 मी. खोल पाठवले जाणार आहे.
- यातून समुद्रातील मौल्यवान धातू आणी कोबाल्ट, निकेल आणी मॅंगनीज यासारख्या खनिजांचा शोध घेतला जाणार आहे.
- या मोहिमेसाठी ‘मत्स्य 6000’ नावाची पाणबुडी समुद्रात पाठवली जाणार आहे. याची निर्मिती ‘National Institute of Ocean Technology’ यांच्यामार्फत केली जाणार आहे.
- ‘Deep Ocean Mission’ या 4077 कोटी खर्चाच्या मोहिमेअंतर्गत ‘समुद्रयान’ प्रकल्पाचे काम होत आहे.
2) आयुष्मान भव: अभियानाचा शुभारंभ
- 13 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 हा कालावधी
- अभियानाचे प्रमुख घटक
2.1 आयुष्मान आपल्या घरी
2.2 रक्तदान, अवयवदान मोहीम
2.3 आयुष्मान सभा
2.4 आयुष्मान मेळावा
2.5 अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी
2.6 18 वर्ष वरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम.
3) रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा पल्ला ओलांडला.
- हे यश गाठणारा रोहित भारताचा सहावा तर 15 वा आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरला आहे.
4) ज्येष्ठ अभिनेते ‘बिरबल’ यांचे निधन.
- मूळ नाव = सत्येंद्र कुमार खोसला
- जन्म = पंजाब
- जवळपास 500 सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.