Current Affairs | चालू घडामोडी | 14 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 14 APR 2024

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती = 14 एप्रिल 1891

 • जन्मस्थळ = महू (मध्य प्रदेश)
 • स्थापना कार्य =
 • मूकनायक = 1920
 • बहिष्कृत हितकारणी सभा = 1924
 • समाज समता संघ = 1927
 • जनता मुखपत्र= 1930
 • स्वतंत्र मजूर पक्ष = 1936

2) इस्रायलशी संबंधित जहाजावर इराणचा कब्जा. १७ भारतीय कर्मचारी संकटात

 • इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’ने संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीत ताबा घेतला.
 • इस्रायलने १ एप्रिल 2024 रोजी इराणच्या सीरियामधील दूतावासावर हल्ला केल्यानंतर या दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे.

3) ‘गेमिंग उद्योगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

 • पंतप्रधान मोदी यांनी आघाडीच्या गेमर्सशी संवाद साधला

4) मूकनायक वर्तमानपत्राचे गाणे

 • ३१ जानेवारी १९२० रोजी स्वजनोद्धाराचे महत्कार्य करण्यास योग्य पंथ दाखविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकावर वामन दादा कर्डक यांनी लिहिलेल्या गीतास छत्रपती संभाजीनगरचे संगीतकार डॉ. संजय मोहड यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘मिश्र खमाज व लोकधून’वर आधारित हे गीत गायक हरिहरन यांनी गायले आहे.
 • ३१ जानेवारी १९२० मध्ये प्रकाशित झालेले मूकनायक हे पाक्षिक होते.
 • सुरुवातीच्या १२ अंकांत बाबासाहेबांचे अग्रलेख प्रकाशित झाले होते. बाबासाहेब आंबेडकर इंग्लडला गेले. तेथून हे पाक्षिक चालविले.
 • 1923 मध्ये मूकनायक बंद पडले.
 • पुढे महाड येथे बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन झाल्यानंतर चळवळीसाठी 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे नवे पाक्षिक प्रकाशित करण्यात आले.

5) शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर : लंडनमध्ये आज (14 एप्रिल 2024) आंतरराष्ट्रीय परिषद

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे 1923 ला सादर केलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन’ या पीएचडी प्रबंधाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने लंडनमध्ये ‘शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

6) गोपी थोटाकुरा : पहिले भारतीय अंतराळ पर्यटक

 • ॲमेझॉन चे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीतर्फे ‘एनएस-२५’ मोहमेवर पर्यटक म्हणून ते अंतराळाची सफर करणार आहेत. या मोहिमेसाठी एकूण सहा जणांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये थोटाकुरा यांचा समावेश आहे.
 • थोटाकुरा हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक होणार आहेत, तसेच ते विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय असतील. शर्मा हे १९८४मध्ये अंतराळात गेले होते.
 • ‘ब्लू ओरिजिन’च्या ‘न्यू शेफर्ड’ कार्यक्रमाअंतर्गत मानवाने अंतराळात जाण्याची ही सातवी मोहीम आहे, तर एकूण इतिहासातील २५वी मोहीम आहे. आतापर्यंत एकूण ३१ मानवांनी पृथ्वीच्या वातावरणाबाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केला आहे.
 • गोपी यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला असून त्यांनी ‘एम्ब्री-रीडर एअरोनॉटिकल युनिव्हर्सिटी’मध्ये पदवी प्राप्त केली आहे.

7) संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन! : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालात ठपका

 • पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात संदेशखाली येथे अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या असून त्यातून मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्याचे सूचित होते असे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

8) HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक बनली आहे

 • सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे
  • HDFC बँकेचे CEO: शशिधर जगदीशन (२७ ऑक्टोबर २०२० पासून)
  • एचडीएफसी बँकेची स्थापना: ऑगस्ट 1994, मुंबई
  • HDFC बँकेचे मुख्यालय: मुंबई
 • लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटे
  • कावरत्ती
  • अगट्टी
  • मिनिकॉय
  • अमिनी
 • कावरत्ती ही लक्षद्वीप बेटांची प्रशासकीय राजधानी आहे
 • 8 डिग्री चॅनेल मिनिकॉय आणि मालदीव बेटांना वेगळे करते
 • 9 डिग्री चॅनेल मिनीकॉय बेटाला मुख्य लक्षद्वीप द्वीपसमूहापासून वेगळे करते

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment