Current Affairs | चालू घडामोडी | 17 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 17 SEPT 2024

1) 17 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 17 सप्टेंबर 1948 = मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  • मराठवाड्याचे भारतात समाविष्टीकरण
  • या दिवशी 1948 मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.
  • 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता.
  • त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामाविष्ट होण्याची संमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली.
  • मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू व काश्मीर आणि जुनागड संस्थान  ही 3 संस्थाने स्वतंत्र भारतात सामाविष्ट झाली नव्हती.
  • हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  यांचे राज्य होते.
  • हैदराबाद संस्थानावर तब्बल 6 पिढ्यांपासून निजाम वंशाचे राज्य होते.
  • त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ  यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम चालू झाला होता.
  • 11 सप्टेंबर 1948 रोजी “OPERATION POLO”  अंतर्गत मेजर जनरल जे.एन चौधरीच्या नेतृत्वाखाली निझाम संस्थानावर कारवाई चालू झाली.

1.2) 17 सप्टेंबर 1879 = ई व्ही रामस्वामी नायकर (पेरियार) जयंती

  • अध्यक्ष = जस्टीस पार्टी (1937)

2) युक्रेनच्या अग्नेयास्त्रांत स्टिलही वितळवणारे थर्माईट

  • रशियन सैनिक लपून असलेले जंगलच युक्रेनने पेटवले
  • थर्माईट म्हणजे काय ?
    • ॲल्युमिनियम पावडर, लोह ऑक्साईडसह निकेल, मैगनीज, फोसिलिकॉनचे प्रमाणषद्ध मिश्रण म्हणजे थमांईट होय.

3) आर्क्टिक टर्न ९६ वर्षांनंतर भारतात

  • सर्वाधिक प्रवास करणाऱ्या पक्ष्याचे ससून डॉकमध्ये दर्शन
  • आर्क्टिक टर्न हा जगातील सर्वाधिक प्रवास करणारा पक्षी आहे.
  • जवळपास नऊ दशकांनंतर तो भारतामध्ये आढळला आहे.

4) गोखले संस्था विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून रानडे यांची नियुक्ती रद्द

  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निकषांची पूर्तता होत नसल्याचे कारण देत डॉ. अजित रानडे यांची गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरील नियुक्ती अडीच वर्षांनंतर रद्द करण्यात आली आहे.
  • कुलगुरू पदासाठीच्या आवश्यक पात्रतांची पूर्तता होत नसल्याने कुलपती डॉ. बिबेक देबरॉय यांनी डॉ. रानडे यांना तत्काळ प्रभावाने पदावरून हटवण्यात आल्याचे पत्र दिले आहे.

5) आर. रवींद्र यांची आइसलँड मधील भारताचे राजदूत

  • परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच आर. आर. रवींद्र यांची आइसलँडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
  • रवींद्र हे 1999 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत.
  • रवींद्र सध्या संयुक्त राष्ट्रात भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
  • यापूर्वी त्यांनी 2001-2003 दरम्यान कैरो येथील भारतीय दूतावासात आणि 2003 – 2007 या काळात लिबियातील त्रिपोली येथे काम केले.

6) दिल्लीच्या मुख्यमंत्री – अतिशी मार्लोना (तिसऱ्या महिला)

  • अरविंद केजरीवाल यांनी केली शिफारस
  • दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुषमा स्वराज
  • दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री : शिला दीक्षित
  • दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री : अतिशी मार्लोना
  • दिल्ली च्या एकुणात 8 व्या मुख्यमंत्री
  • जन्म-8 जून 1981
  • जन्म स्थान- दिल्ली
  • पति- प्रवीण सिंह
  • शिक्षण- इतिहास मध्ये मास्टर्स ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी
  • 2013 : आम आदमी पक्षात सहभाग
  • 2015 : खंडवा जल सत्याग्रह मध्ये भाग
  • 2015-18 :- मनीष सिसोदिया यांची सल्लागार म्हणून काम
  • 2019 : लोकसभा निवडणूक त्या हरल्या होत्या
  • 2020 : दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकल्या
  • आप च्या गोवा युनिट च्या ईंचार्ज
  • 2023 : कॅबिनेट मंत्रीपद

7) अतिशी मार्लेना भारताला मिळालेल्या 17 व्या महिला मुख्यमंत्री

  • पहिल्या महिला मुख्यमंत्री = सुचेता कृपलानी (काँग्रेस) – उत्तर प्रदेश
  • महाराष्ट्राला अजून एकदाही महिला मुख्यमंत्री लाभलेल्या नाहीत

8) Men’s Hockey Asian Champions Trophy 2024

  • भारताने पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, हॉकीच्या अंतिम सामन्यात चीनला हरवून इतिहास रचला.
  • विजेता = भारत 🥇🇮🇳
  • उपविजेता = चीन 🥈
  • ठिकाण= हुलुनबुर सिटी (चीन)🇹🇴
  • यापूर्वीचे जेतेपद = 2011,2016,2018,2023,2024
  • स्पर्धा 2011 साली सुरुवात झाल्या

9) कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिले कॉलेज सूरू होणारं आहे.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment