Current Affairs | चालू घडामोडी | 18 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 18 सप्टेंबर दिनविशेष
1.1) 18 सप्टेंबर 1927 = महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ची स्थापना
- संस्थापक = वालचंद हिराचंद
2) पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना ७५ लाख
- क्रीडामंत्र्यांची घोषणा : ‘रौप्य’ विजेत्यांना ५० लाख, ‘कांस्य’ जिंकणाऱ्यांना ३० लाख रुपये
- भारताचे सुवर्ण पदक जिंकणारे खेळाडू
- अवनी लेखरा – सुवर्णपदक – महिलांची 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1
- नितेश कुमार – सुवर्णपदक – बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3
- सुमित अंतिल – सुवर्ण पदक – पुरुष भालाफेक F64
- हरविंदर सिंग : सुवर्णपदक : धनुर्विद्या पुरुषांचे वैयक्तिक रिकर्व्ह खुले
- धरमबीर : सुवर्णपदक : पुरुष क्लब थ्रो 51
- प्रवीण कुमार :सुवर्णपदक: पुरुषांची उंच उडी T64
- नवदीप सिंग : सुवर्णपदक : पुरुष भालाफेक F41
3) अंतराळात चार यार, मशिनशिवाय एक्स-रे काढणार
- पायाखाली नसेल काही आणि २० मिनिटे चालणार; पोलारिस डॉन मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण
- एलन मस्क यांच्या स्पेसएक्सतर्फे आयोजित व धाडसी उद्योगपती जेअर्ड आयॉकमन प्रायोजित पोलारिस डॉन या खासगी अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण नासाच्या फ्लोरिडा येथील जॉन एफ. केनेडी अंतराळ स्थानकावरून मंगळवारी झाले.
- या मोहिमेअंतर्गत ४ अंतराळवीर पृथ्वीपासून ७०० कि.मी. वर अंतराळात चालणार आहेत. (स्पेसवॉक करणार आहेत.)
- जगातील हा पहिला खासगी स्पेसवॉक असेल, एक्स-रे मशिनशिवाय एक्स-रे काढण्याचा प्रयोगही या मोहिमेत केला जाईल.
- अंतराळवीरांचे ड्रॅगन कॅप्सूल स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटमधून प्रक्षेपित झाले. अंतराविरांनी स्पेसएक्सने विकसित केलेला ईव्हीए सूट परिधान केलेला होता.
- कॅप्सूलमधून हे ४ अंतराळवीर पृथ्वीपासून ७०० कि.मी. उंचीवर जातील. पाच दिवसांची ही मोहीम असून, गेली ५० वर्षे कुठलाही अंतराळवीर ज्या कक्षेत गेलेला नाही, त्या कक्षेसाठी हे अंतराळवीर निघाले आहेत.
4) अल नजाह : संयुक्त लष्करी सराव
- भारत-ओमान संयुक्त लष्करी सराव “अल नजाह” च्या 5 व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी सलालाह, ओमान येथे रवाना झाली आहे.
- संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या तुकडीत 60 सैनिकांचा समावेश आहे.
- मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या बटालियनद्वारे त्याचे प्रतिनिधित्व केले जाते.
- अल नजाह हा सराव 2015 पासून भारत आणि ओमान दरम्यान द्वैवार्षिक आयोजित केला जातो.
5) हिंदी दिवस : 14 सप्टेंबर
- हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी भारतातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये साजरा केला जातो.
- 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने घेतलेला निर्णय, भारताची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार करण्याचा हा दिवस आहे .
- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
- त्यांच्या कार्यकाळात 14 सप्टेंबर 1953 रोजी देशात प्रथमच हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
- 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो.
- हिंदीबद्दल मनोरंजक माहिती
- हिंदीचे नाव हिंद या पर्शियन शब्दावरून पडले आहे, ज्याचा अर्थ “सिंधू नदीची भूमी” आहे.
- हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मानली जाते.
- उर्दूऐवजी हिंदी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारणारे बिहार हे पहिले राज्य आहे.
6) नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ (Tribal University) स्थापन करणार
- आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात 80 टक्के आदिवासी, तर 20 टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
- या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
7) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक देश एक निवडणूक करण्याच्या प्रस्तावाला सर्वसंमतीनं मंजुरी देण्यात आली आहे.
- One Nation One Election (ONOE) ही एक घटनादुरुस्ती म्हणून संसदेत सादर केली जाईल.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel