Current Affairs | चालू घडामोडी | 19 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 19 सप्टेंबर दिनविशेष
1.1) 19 सप्टेंबर 1960 = इंडस वॉटर ट्रीटीवर स्वाक्षरी
- नेते = जवाहरलाल नेहरू आणि आयुब खान
2) जोरावर रणगाडा
- वाळवंट असो वा पर्वत, शत्रूला संपविणार जोरावर
- बिकानेर येथे या रणगाडा ची चाचणी घेण्यात आली.
3) महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांना युनेस्को चे नामांकन
- जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी होणार पाहणी
- सुवर्णदुर्ग (रत्नागिरी)
- रायगड (रायगड)
- खांदेरी (रायगड)
- सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग)
- विजयदुर्ग (सिंधुदुर्ग)
- शिवनेरी (पुणे)
- लोहगड (पुणे)
- राजगड (पुणे)
- पन्हाळा (कोल्हापूर)
- प्रतापगड (सातारा)
- साल्हेर (नाशिक)
4) फुरसुंगी, उरुळीला नगर परिषद
- राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या हद्दीतील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे वगळून त्याची वेगळी नगर परिषद करण्याच्या निर्णयावर अखेर बुधवारी शिक्कामोर्तब केले
5) जपान बनवणार पहिला ‘झेटा-क्लास’ सुपरकॉम्प्युटर
- सध्याच्या सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर्सना मागे टाकणारा पहिला ‘झेटा-क्लास’ सुपरकॉम्प्युटर बनवण्याची तयारी जपानने केली आहे.
- पुढील वर्षापासून हा सुपरकॉम्प्युटर बनवण्याचे काम सुरू होईल आणि २०३० पर्यंत हा सुपरकॉम्प्युटर सुरू होईल.
- हा सुपरकॉम्प्युटर ज्यावेळी पूर्णपणे संचालित होईल, त्यावेळी तो सध्याच्या सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर्सपेक्षा एक हजार पट अधिक वेगाने काम करील.
6) तेजस उडवणारी मोहना सिंह बनली पहिली महिला वैमानिक
- नवी दिल्ली स्क्वॉड्रन लीडर मोहना सिंह स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस उडवणारी पहिली महिला वैमानिक बनली आहे.
- ती तेजसचे संचालन करणाऱ्या ’18 फ्लाइंग बुलेट्स’ स्क्वॉड्रनमध्ये सामील झाली आहे.
- जवळपास 8 वर्षांपूर्वी ती पहिली महिला फायटर पायलट बनली होती
7) युद्ध सराव – काकडू 2024
- ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा युद्ध सराव काकडू 9 सप्टेंबर पासून सुरू झाला आहे.
- या सरावात 30 हून अधिक देशांचे संरक्षण कर्मचारी आणि तोफखाना भाग घेत आहेत. या युद्धसरावात भारताचा पण समावेश आहे.
- यात युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि सागरी गस्ती विमानांचाही समावेश आहे.
- यंदा या सरावात तीन हजारांहून अधिक लष्करी जवानांचा सहभाग आहे.
- सुरुवात : 1993
- प्रादेशिक सहकार्य वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे
- हा सराव सहभागी देशांमधील सौहार्द आणि परस्पर क्रियांना प्रोत्साहन देतो.
8) हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी हेमंत पाठील
- शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत पाटील यांना वसमत येथील हळद संशोधन केंद्राच्या (Turmeric Research Center) अध्यक्ष पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
- हे पद मंत्री दर्जाचे राहणार असून अध्यक्षांच्या सोयी-सुविधांसाठी लागणारा खर्च संशोधन केंद्राकडे उपलब्ध असलेल्या निधीतून केला जाणार आहे.
- देशातले पहिले हळद संशोधन केंद्र ‘वसमत’ (जिल्हा हिंगोली) येथे होत आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel