Current Affairs | चालू घडामोडी | 18 APR 2024
1) 18 एप्रिल
1.1) सूर्यसेनचा चितगाव शस्त्रगारावर हल्ला = 18 एप्रिल 1930
- सहकारी = कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार
1.2) भूदान चळवळीचा प्रारंभ = 18 एप्रिल 1951
- नेते = विनोबा भावे
- स्थळ = पोचमपल्ली (तेलंगणा)
1.3) दामोदर चाफेकर फाशी = 18 एप्रिल 1898
- कारण = रँडची हत्या, पुणे
2) साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम. सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन
- देशात ५३५ कारखान्यांनी आतापर्यंत ३१८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादित केली आहे. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांचा वाटा ८३ टक्के आहे.
3) पूर्वप्राथमिक शिक्षण बोलीभाषेत
- ‘एनसीईआरटी’कडून देशभरात ५४ अभ्यासक्रम
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये स्थानिक भाषा, मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने एनसीईआरटीने देशभरातील ५४ स्थानिक भाषांत पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करून प्रसिद्ध केला आहे.
- या भाषांमध्ये महाराष्ट्रातील खान्देशी भाषेचाही समावेश केला आहे
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२२मध्ये तीन ते आठ या वयोगटांतील मुलांना त्यांच्या मातृभाषा, घरात बोलली जाणारी भाषा, प्रादेशिक भाषेत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
4) ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
- शाळेतील काचणाऱ्या गोष्टी टाळून मुलांना समृद्ध करणारे अनुभव अखंड देत राहणे, मुलांच्या आयुष्यात शाळा ही रम्य आठवणींची साखळी ठरावी या तत्त्वावर विश्वास ठेवून चंदावरकर यांनी शिक्षणक्षेत्रात योगदान दिले.
- आधुनिक बालमानसशास्त्राच्या आधाराने त्यांनी अनोखे उपक्रम राबवले.
- अक्षरे, आकडे शिकण्याबरोबर साहित्य, संगीत, चित्रकला अशा विषयांना त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले.
- पुण्यातील अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी तीस वर्षे काम केले. त्यानंतर न्यू इंडिया शाळेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले.
- त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
5) महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज सर्वाधिक ‘श्रीमंत’ उमेदवार
6) भारताची लोकसंख्या १४४ कोटी
- युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (यूएनएफपीए) च्या अहवालानुसार भारताची अंदाजे लोकसंख्या १४४ कोटी झाली आहे. २४ टक्के लोक ० ते १४ वयोगटातील आहेत. भारतात २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत १२१ कोटी लोकसंख्या होती.
- ‘यूएनएफपीए’चा जागतिक लोकसंख्या २०२४ अहवाल – ‘इंटरवोव्हन लाइव्ह, थ्रेड्स ऑफ होप: एंडिंग इनइक्वॅलिटी इन सेक्शुअल अँड रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ अँड राइट्स’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ७७ वर्षांत भारताची लोकसंख्या दुप्पट होईल असा अंदाज आहे.
- १४४.१७ कोटी लोकसंख्येसह भारत जागतिक पातळीवर आघाडीवर आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची १४२.५ कोटी लोकसंख्या आहे.
- अहवालानुसार पुरुषांचे आयुर्मान ७१ वर्षे आणि महिलांचे ७४ वर्षे आहे.
- भारतातील माता मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
7) अयोध्यात पार पडला प्रभू श्रीरामांचा सूर्य तिलक सोहळा
- यासाठी आयआयटी रुरकी ने तयार केली होती प्रणाली
8) चित्रपट निर्मात्यांना आता मिळणार ‘सामना पुरस्कार’
- निळू फुले श्रीराम लागू पंडित भास्कर चंदावरकर आणि विजय तेंडुलकर या दिगज यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू होणार आहे
- ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी या पुरस्काराची घोषणा केली
9) पेंच प्रकल्पात फायर डिटेक्शन सिस्टीम
- देशातील पहिलाच प्रयोग. या अगोदर अमेझॉन जंगलात वापर
- जंगलातील वनव्यावर तातडीने नियंत्रण प्रस्थापित करता यावे तसेच यंत्रणेला आगीची माहिती मिळावी म्हणून हा प्रकल्प स्थापित
- सध्या ‘फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया’ एफएसआय जंगलातील आगे बाबत सूचना देत असते
10) क्लाऊड सीडींग च्या परिणामामुळे दुबई शहरात मुसळधार पाऊस
- कृत्रिम रित्या पाऊस पाडण्याच्या या पद्धतीत छोटी विमाने ढगांमध्ये जाऊन विशिष्ट प्रकारचे मीठ फवारतात. या मिठामुळे ढगांमध्ये पाणी निर्माण होऊन पाऊस कोसळतो
- रॉकेटमध्ये सिल्व्हर आयोडाइड (Silver Iodide), कोरडा बर्फ (Dry Ice)आणि क्लोराइड (Chloride) भरून ते सोडलं जातं. त्यामुळे आजूबाजूला ढग तयार होतात आणि पाऊस पडतो.
11) भूमि राशि (Bhoomi Rashi) पोर्टल
- रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग (National Highways) प्रकल्पांची भूसंपादन प्रक्रिया डिजिटल करण्यासाठी भूमि राशि पोर्टल विकसित केले आहे.
- या पोर्टल व्दारे संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया डिजिटल करण्यात आली असून ती पेपरलेस झाली आहे.
- यामुळे भुसंपादन प्रक्रिया कार्यक्षम व कमी वेळात पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
- तसेच विविध शासकीय विभाग एकमेकांना जोडले जाणार आहेत.त्यामुळे समन्वय व सुसुत्रता वाढेल.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel